पुणे : पुणे शहरात नेमकं चाललंय तरी काय? शहरातील कल्याणीनगर अपघातापासून ते आजपर्यंत घडलेल्या घटनांचा विचार केला तर शहरामध्ये अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत. ड्रग्ज, अपघात, खून, हत्या, आत्महत्या, बलात्कार, विनयभंग असे अनेक प्रकार घडले. त्यानंतर एफसी रोडवरील अल्पवयीन मुलांचा अमली पदार्थांचे सेवन करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यातच आता येरवडा परिसरातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
शहरातील येरवडा परिसरामध्ये २ अल्पवयीन तरुणी राहत्या घरातच दारु पार्टी करत होत्या. त्यापैकी एका तरुणीने आत्महत्या केली असून दुसरी मुलगी बेशुद्ध अवस्थेत आढळली आहे. तरुणीने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या घटनेचा पोलीस तपास सुरू आहे. पार्टी करणाऱ्या मुली अल्पवयीन असल्याची माहिती मिळत आहे. येरवडा भागातील धक्कादायक घटनेने संपूर्ण पुणे शहर हादरुन गेले आहे.
संंबंधित दोन्ही तरुणींनी रहात्या घरी दारू पिऊन पार्टी केली होती. मुलीच्या एकत्र येऊन दारू पिण्याचे व उलट्या केल्याचे घरी आढळून आले. त्यापैकी एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली तर दुसरी तरुणी बेशुद्ध अवस्थेत होती. आत्महत्या केलेल्या तरुणीने देखील मद्य प्राशन केले होते. त्यानंतर मृत तरुणीला शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तसेच बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या तरुणीने देखील अतिप्रमाणात मद्यसेवन केल्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिलाही उपचार कामे ससून रुग्णालय येथे दाखल केले आहे. या सर्व प्रकरणावरुन पालकांनी मुलांवर लक्ष देणे आता खूप गरजेचे आहे.
महत्वाच्या बातम्या-
-विठूरायाच्या पंढरीत ‘बीव्हीजी’ची स्वच्छता सेवा; बीव्हीजीचे ४०० स्वच्छता दूत सज्ज
-ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकर मैदानात; केल्या ‘या’ प्रमुख ६ मागण्या
-एकदा संधी द्या! आमदार होऊनच दाखवतो, काँग्रेसच्या आबा बागुलांनी घेतली शरद पवारांची भेट
-बारामतीच्या राजकाणात मोठी घडामोड; काका-पुतणे येणार आमनेसामने, नेमकं काय प्रकरण?