पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवारांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष आणि अजित पवारांचे कट्टर समर्थक असणारे अजित गव्हाणे यांनी अजित पवारांची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारमध्ये प्रवेश केला. भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे पहायला मिळत आहे.
भोसरी विधानसभा मतदारसंघातील ठाकरेंच्या शिवसैनिकांनी अजित गव्हाणे यांच्या पक्षप्रेवशावर नाराजी व्यक्त केली आहे. त्याच वेळी शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा भोसरी विधानसभेत आज होणारा जनता दरबार अपरिहार्य कारणामुळे रद्द करण्यात आला. मात्र ठाकरेसेनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या नाराजीमुळे हा कार्यक्रम रद्द झाला असल्याची चर्चा आहे.
खासदार अमोल कोल्हे यांना शिरुर लोकसभेतून जनतेने सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून दिले आहे. अमोल कोल्हेंच्या खासदारकीसाठी महाविकास आघाडीच्या काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जीव तोडून काम केले होते. आणि याच काळात महाविकास आघाडीविरोधात अजित पवार गटाचे पदाधिकारी काम करत होते. याच पदाधिकाऱ्यांनी आता शरद पवार गटात प्रवेश केल्यामुळे भोसरी विधानसभेतील शिवसैनिक नाराज असल्याचे समोर आले आहे. याबाबत ते आज मुंबई येथे मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची देखील माहिती मिळत आहे.
दरम्यान, अजित गव्हाणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला तर भोसरी विधानसभेची उमेदवारी त्यांना जाण्याची शक्यता आहे. अमोल कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात विधानसभानिहाय जनता दरबार कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. भोसरीमध्ये १८ जुलै रोजी २ ठिकाणी जनता दरबार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होता. मात्र काही अपरिहार्य कारणास्तव हे दोन्ही जनता दरबार तूर्तास पुढे ढकलण्यात आले असून लवकरच नवीन तारीख कळवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-महेश लांडगेंच्या पाठपुराव्याला यश; चोविसावाडी-चऱ्होली येथील कचरा स्थानांतरण केंद्र अखेर रद्द!
-नाद करा पण पोलिसांचा कुठं?; मनोरमा खेडकर महडच्या हॉटलमध्ये लपल्या होत्या, अखेर पोलिसांनी अटक केलंच
-अजित पवारांना पुन्हा पक्षात घेणार का?; शरद पवार म्हणाले, ‘घरामध्ये सगळ्यांना जागा’
-शिक्षण संस्थांनी मुलींना प्रवेश नाकारला तर….; चंद्रकांत पाटलांचा शिक्षण संस्थांना इशारा