पुणे : एकीकडे महाराष्ट्र राज्यात गणेश विसर्जनाचा जल्लोष पहायला मिळाला. तर दुसरीकडे पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय घडामोड घडल्याचे पहायला मिळाले. भाजपचे माजी आमदार बापू पठारे आणि त्यांच्यासह ३ माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला.
काल (बुधवारी) अनंत चतुर्दशीचा मुहूर्त गाठून बापू पठारे, माजी नगरसेवक महेंद्र पठारे, माजी नगरसेवक भैय्यासाहेब जाधव आणि माजी नगरसेवक महादेव पठारे यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला. बापू पठारे यांनी मुंबईत ‘सिल्व्हर ओक’ येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशाने भाजपला ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे.
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आदरणीय खासदार श्री. शरदचंद्रजी पवार साहेब व पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, महासंसदरत्न खासदार माननीय सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सिल्व्हर ओक येथे वडगाव शेरी मतदारसंघाचे माजी आमदार श्री.… pic.twitter.com/AOvbs5Tpbn
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) September 17, 2024
बापूसाहेब पठारे यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत वडगावशेरी मतदारसंघातून शरद पवार गटातून त्यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे. अजित पवार गटाचे सुनील टिंगरे हे या मतदारसंघाचे आमदार आहेत. सद्या या मतदारसंघात महायुतीकडून मोठ्या प्रमाणावर इच्छुक आहेत. त्यामुळे आता महायुतीकडून हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जातो की अजित पवारांकडेच राहणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यावरुन वडगाव शेरीतील राजकीय गणितं बदलणार असल्याचे पहायला मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात कायदा सुवस्थेचे धिंडवडे; ३ दिवसांत ३ गोळीबार, शहरात नेमकं काय चाललंय?
-ससून रुग्णालयात मोठा अर्थिक घोटाळा; ४ कोटी रुपयांचा गैरव्यावहार नेमका केला कोणी?
-महायुतीत वाद होण्याची शक्यता; शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला पुण्यातील एकच जागा?