पुणे: केंद्र सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला नवीन मोटार वाहन कायदा विरोधात देशभरातील वाहतूक संघटना आक्रमक झाल्याच दिसत आहे. राष्ट्रीय ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन देखील नवीन कायद्या विरोधात रस्त्यावर उतरली आहे. “सरकारने चालकांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न न करता आमच्याशी चर्चा करावी, सध्याचे आंदोलन हे शांततेत सुरू असून हिंसक वळण देण्याचा प्रयत्न केला जात आहे” असा आरोप फेडरेशनचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केला आहे.
रस्त्यावर एखादा अपघात झाल्यास संबंधित ठिकाणावरून वाहन चालक पळून गेला तर 7 वर्षांची शिक्षा व 7 लाख रुपये आर्थिक दंड आकारण्याचा कायदा आणण्यात आला आहे. याला आम्ही काळा कायदा म्हणत असून काल आंदोलनाला मुंबईत हिंसक वळण लागले. शांततेत आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, त्यामुळे आता थेट दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन करणार असल्याचं बाबा कांबळे यांनी पत्रकार परिषद सांगितल आहे.
दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर करण्यात आलेल्या आंदोलनात देशभरातील विविध वाहतूक संघटना सहभागी होणार असून सध्या सुरू असलेले आंदोलन कोणत्याही संघटनेने अधिकृत जाहीर केलेले नाही. या काळ्या कायद्याविरोधात स्वयंस्फूर्तीने ट्रकचालकांनी हे आंदोलन पुकारले आहे. आंदोलक ट्रक चालकांवर सरकारकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा देखील.