पुणे : पुणे शहरामध्ये वाढत्या लोकसंख्ये बरोबरच वाहनांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे वाहतूकीच्या अनेक समस्या उद्भवत असतात. पीएमपीमुळे देखील शहरात अनेक अपघात होत असायचे त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात होती. याच टीकांची पीएमपी प्रशासनाने गंभीर दखल घेतल्याचे पहायला मिळत आहे.
पीएमपीकडून प्रशासन स्व-मालकीच्या चालकांसह ठेकेदारांच्या सर्व चालकांना प्रशिक्षण देणे सुरू केले आहे. केंद्रीय सडक परिवहन संस्था (सीआयआरटी) येथे जानेवारी महिन्यापासून हे प्रशिक्षण सुरू आहे. आतापर्यंत ८५० चालकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, पहिल्यांदाच संपूर्ण महिन्यांत ‘पीएमपी’चा एकही अपघात झाला नसल्याची आनंदाची बाब आहे.
पीएमपी बस चालकांकडून होणाऱ्या चुकांमुळे दररोज ३ ते ४ अपघात होत असल्यामुळे अधिकाऱ्यांपासून चालकांपर्यंत नागरिकांकडून वारंवार टीका होत होती. या टीकांची दखल घेत पीएमपीच्या वतीने सर्व चालकांना रस्ते वाहतुकीचे नियम व कायदे, प्रवाशांची सुरक्षितता, बसमधील तांत्रिक बाबी यांसह अन्य मुद्द्यांवर प्रशिक्षण देण्याचे ठरवले होते. त्याप्रमाणे सीआयआरटीकडून चालकांना प्रशिक्षण देण्यात येत असून त्याचा चांगलाच फायदा झाल्याचे दिसत आहे. चालकांना प्रशिक्षण दिल्यामुळे शहरात जानेवारी महिन्यात एकही अपघात झाला नाही.
महत्वाच्या बातम्या-
-आमदारांना हवाय पालिकेचा कोट्यवधींचा निधी; वार्षिक अंदाजपत्रकात सुरु घुसखोरी!
-कपल्सचे चाळे अन् कॅफेच्या नावाखाली सुरु होता भलताच कारभार; पोलिसांनी खाकी दाखवताच…
-वराती मागून घोडे: ‘जीबीएस’ उद्रेकानंतर राज्य सरकारला आली जाग! शुद्ध पाण्याबाबत उचललं मोठं पाऊल
-पुण्यातून सुरुवात देशभरात पसरली पाळेमुळे, ११९६ कोटींच्या घोटाळ्याचे पुणे कनेक्शन
-‘राजकारणाचा पोरखेळ कोणी केला’ दिल्लीतील ‘त्या’ कार्यक्रमावरुन पुण्यात वादंग, नेमका काय प्रकार?