पुणे : हडपसर भागातील पुणे-सोलापूर हायवे लगत भाजीमंडई, गाडीतळ, आकाशवाणी आणि मगरपट्टा भागात खासगी ट्रॅव्हल्स बस थांबलेल्या असतात. या बसमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. या बसमुळे स्थानिक नागरिक आणि इतर वाहन चालकांना प्रचंड त्रास होतो. यावर या खासगी ट्रॅव्हल्स बस अधेमधे न थांबता थेट शेवाळेवाडी येथे थांबण्याच्या सूचना हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी दिले आहेत.
वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी चेतन तुपे यांनी रस्त्यावर उतरल्याचे पहायला मिळाले. हडपसर भागात भर रस्त्यात ट्रॅव्हल्स बस थांबत असतात त्यामुळे वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागलेल्या असतात. यावर कायमचा मार्ग काढण्याची मागणी स्थानिकांनी केली. त्यावर पुणे वाहतूक पोलिसांनी पर्याय शोधून खासगी ट्रॅव्हल्स बसचालकांना शेवाळेवाडी येथील पीएमपी प्रशासनाची जागा भाडेतत्त्वावर घेण्याचा प्रस्ताव दिला आहे.
पुणे सोलापूर मार्गावरील हडपसर येथे अनधिकृतपणे होणारा खाजगी बसेस थांबा आणि पार्किंग आता शेवाळेवाडी येथे पीएमपीएल बस डेपोच्या जागेत हलविण्यात आले आहे. माझ्या अथक पाठपुराव्याने तसेच विधानभवनात देखील यावर आवाज उठविल्याने पुणे मनपा व प्रशासनाने आमची दखल घेत हा थांबा मंजूर केला आहे. pic.twitter.com/z05zAam4tZ
— Chetan Vitthal Tupe (@ChetanVTupe) June 10, 2024
हडपसर भागात मोठी बाजारपेठ, कपड्यांची मोठी दुकाने आहेत. त्यामुळे या भागात ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच या मार्गे प्रवास करणारे प्रवासी देखील येत असतात. त्यामुळे या भागात प्रचंड गर्दी होते. परिणामी वाहतूक कोंडी होते. आता खासगी ट्रॅव्हल्स बस रस्त्यात उभ्या न करता थेट शेवाळेवाडी येथे थांबविण्यात याव्या, अशा सूचना दिल्या जात होत्या. आता या भागात खासगी बस थांबणार नसल्याने वाहतूक कोंडीतून वाहनचालकांची सुटका होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘एकच मुलगी असलेल्या बापाला अनेक गोष्टी…’; शरद पवारांचं बारामतीत मोठं वक्तव्य
-“तुम्ही नगरसेवक नसतानाही केलेलं काम…” सत्यजीत तांबेंची मोहोळांसाठी ‘खास’ पोस्ट
-शिरूरमध्ये महाविकास आघाडीत वादाची ठिणगी; अमोल कोल्हेंच्या ‘त्या’ वक्तव्याने मोठा वाद
-“बारामतीच्या विकासासाठी मोदींची मदत घ्यायलाही मागे पुढे पाहणार नाही”
-पुण्यात तुबलेल्या पाण्याने नागिकांचे हाल; सुप्रिया सुळेंनी पालिका प्रशासनाला दिला आंदोलनाचा इशारा