पुणे : पुणे लोकसभा निवडणूक ही चौथ्या टप्प्यात होणार आहे. या निवडणुकीचे मतदान येत्या १३ तारखेला होणार आहे. पुणे लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज सभा घेणार आहेत. मनसेने महायुतीला जाहीर पाठिंबा दिल्यापासून राज ठाकरे हे महायुतीच्या अनेक उमेदवारांसाठी सभेला हजेरी लावताना दिसले आहेत. त्यातच आता राज ठाकरे यांची तोफ आज पुण्यात धडाडणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील सक्षेच्या ठिकाणजवळील वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत.
शुक्रवारी १० मे रोजी दुपारनंतर ४ वाजता सारसबाग येथे राज ठाकरेंची सभा आयोजित करण्यात आली असून सारसबागग परिसरातील वाहतुकीत बदल केले आहेत. सभेस होणारी गर्दी विचारात घेऊन या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. सिंहगड रस्त्यावरून बाजीराव रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी केले आहे.
सारसबाग जवळील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा परिसरातून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी मित्रमंडळ चौक, लक्ष्मीनारायण चित्रपटगृहमार्गे इच्छितस्थळी जावे. बाजीराव रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी मित्रमंडळ चौक, सावरकर पुतळा चौक, सिंहगड रस्ता, दांडेकर पूल चाैकमार्गे इच्छितस्थळी जावे. स्वारगेट येथील देशभक्त केशवराव जेधे चौकातून बाजीराव रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी लक्ष्मीनारायण चित्रपटगृह, मित्रमंडळ चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा चौक, दांडेकर पूलमार्गे इच्छितस्थळी जावे. सातारा रस्ता, शंकरशेठ रस्त्याने बाजीराव रस्त्याकडे येणाऱ्या वाहनचालकांनी लक्ष्मीनारायण चित्रपटगृह चौक, मित्रमंडळ चौक, दांडेकर पूलमार्गे इच्छितस्थळी जावे.
महत्वाच्या बातम्या-
-पवारांच्या आमदाराला अजित दादांचं चॅलेंज; म्हणाले, “अरे मंत्री बनायला निघाला पण आता आमदार कसा होतो…”
-पुण्याच्या मैदानात घुमणार नितीन गडकरींचा आवाज, जाहीर सभेतून मांडणार विकासाचा रोडमॅप
-लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पुण्यात ३ दिवस जमावबंदी; पुणे पोलीस सहआयुक्तांचे आदेश
-‘तेव्हा शरद पवारांच्या अंगावरून साप गेला अन् आठ दिवसांनी…’; सुप्रिया सुळे यांनी सांगितली ‘ती’ आठवण
-मोदींच्या सांगण्यावरुन पुतीनने युद्ध थांबवल्याची जगात मोदींची प्रतिमा; अजित पवारांची स्तुतीसुमने