पुणे : सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात तोफ धडाडणार आहे. मनसेच्या राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त जाहीर पाठिंबा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर महायुतीचे पुणे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. सारसबाग परिसरात सायंकाळी ६ वाजता ही सभा होणार आहे. राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यानंतर त्यांची ही दुसरी सभा असणार आहे.
नारायण राणे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरेंनी सभा घेतली त्यांनंतर उद्या पुण्यात मोहोळांसाठी सभा होणार आहे. उद्याच्या सभेत राज ठाकरे हे नेमका कोणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सभेच्या आयोजनासाठी महत्वाची बैठक पार पडली. यामध्ये राज ठाकरे यांच्या सभेत योग्य पद्धतीने नियोजन करण्यात येणार आहे. बाळा नांदगावकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.
पुणेकर मतदार युवक राज ठाकरे यांचे विचार ऐकण्यास उत्सुक असतो. मनसेला मानणारा मोठा मतदार पुणे लोकसभा मतदारसंघात आहे. मनसेचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोहोळ यांच्या प्रचारात एकदिलाने उतरले आहेत. ही सभा यशस्वी करण्यासठी आम्ही सर्व जण काम करत आहोत. सभेला चांगली गर्दी होईल, असा विश्वास व्यक्त केला गेला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“मी माझ्या राजकीय जीवनात मोठी चूक केली ती म्हणजे…”; अजित पवार असं का म्हणाले?
-“शरद पवार जे म्हणतील तेच उद्धव ठाकरे करतील”; फडणवीसांचा ‘त्या’ चर्चेवरुन फडणवीसांना खोचक टोला
-“मला कोणी खोट्यात काढलं तर मी सहन नाही करणार, मी कोणाच्या ५ पैशात मिंदा नाही”
-“नुसते डायलॉग बोलत शिरुरच्या मतदारांना भुलवतोय”; शिरुरच्या सभेत अजित पवारांचा कोल्हेंवर हल्लबोल
-विकसित पुण्यासाठी मुरलीधर मोहोळांचे संकल्पपत्र! शहराच्या विकासासाठी मांडला रोडमॅप