पुणे : विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. त्यानंतर आता नागपूर येथे रविवारी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. या मंत्रिमंडळात भाजपला २२, शिंदेंच्या शिवसेनेला १२ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ९ मंत्रिपद मिळणार असल्याचे बोलले जात आहे. अशातच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे दौऱ्यावर आहेत. आज संध्याकाळी होणाऱ्या पुस्तक महोत्सवाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या उद्घाटन समारंभाला जिल्ह्यातील आमदार उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातून भावी मंत्री होणाऱ्या नेत्यांना फडणवीसांकडून मंत्रिपदाबाबतचा निरोप मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुणे जिल्ह्यात एकूण २१ पैकी १९ आमदार महायुतीचे आहेत. या १९ पैकी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीला प्रत्येकी एक मंत्रिपद मिळणार असल्यामुळे मंत्रिपदाची आस लावून बसलेल्या आमदारांमध्ये सध्या प्रचंड अस्वस्थता दिसून येत आहे. अशातच फडणवीस सरकारमध्ये नव्या चेहऱ्याला संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. चंद्रकांत पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
भाजपच्या माधुरी मिसाळ आणि भीमराव तापकीर हे चौथ्यांदा निवडून आले असली तरी त्यांना सध्यातरी मंत्रिपद मिळाले नाही. तर सिद्धार्थ शिरोळे आणि सुनील कांबळे हे दुसऱ्यांदा आमदार झाले असून यांच्यासह राहुल कूल आणि महेश लांडगे हे देखील राज्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये आहेत. तर दुसरीकडे विधान परिषदेचे आमदार योगेश टीळेकर यांची देखील ओबीसी चेहरा म्हणून मंत्रिपदावर वर्णी लागू शकते. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील एक कॅबिनेट मंत्री भाजपकडून शपथ घेणार हे देखील निश्चित मानलं जात आहे. फडणवीस सरकारमध्ये कोणत्या नव्या चेहऱ्याला संधी मिळणार हा सस्पेन्स आज फडणवीस संपवतील.
महत्वाच्या बातम्या-
-‘पवार साहेबांनी निर्णय घेतला तर सगळेच एकत्र येतील’; शरद पवारांच्या प्रवक्त्याचा दावा
-पुण्यातील ‘ही’ बँक बनली मंदिर! साडे ३ किलो दत्त मुर्तीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
-महापालिका निवडणूक कधी होणार? इच्छुकांचे जीव टांगणीला, पडद्यामागे काय घडतंय?
-काका-पुतणे एकत्र येण्यासाठी पवार कुटुंबीय सरसावले, रोहित पवारांच्या आईचं मोठं वक्तव्य
-‘मी नगरसेवक बोलतोय, तू फक्त येस ऑर नो सांग’; पुण्यात धक्कादायक प्रकार