T20 World Cup 2024 : भारताने शनिवारी टी-२० विश्वचषक आपल्या नावावर करत इतिहास रचला आहे. २००७ साली झालेल्या पहिल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वखाली टीम इंडियाने विजय मिळवला होता. त्यानंतर भारताने तब्बल १७ वर्षांनी हा विजय मिळवला आहे.
भारताने टी-२० विश्वचषकमध्ये मिळवलेल्या विजयामध्ये कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे अशा फलंदाजांसोबतच बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल यांच्या गोलंदाजीचीही छाप उमटली आहे. अंतिम सामन्याच्या ‘अंतिम’ ५ षटकांमध्ये भारतीय संघाने विजय आपल्याकडे वळवला आणि भारताने दक्षिण आफ्रिकेच्या हातून विश्वचषक हिसकावला.
View this post on Instagram
शेवटच्या ५ षटकारामध्ये सूर्यकुमार यादवने आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरचा कॅच पकडून भारताला विजयाच्या आणखी जवळ नेले आहे. इथेच या सामन्याला कलाटणी मिळाली अन् भारताने आपल्या हा विश्वविजय आपल्या नावावर केला.
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेसमोर १७७ धावांचे लक्ष्य ठेवले. हा सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला होता. अखेरच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला १६ धावांची गरज होती. मात्र, मोक्याच्या क्षणी हार्दिक पांड्याने आपल्या अफलातून गोलंदाजीने टीम इंडियाचा ७ धावांनी विजय मिळवून दिला.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यनगरीत आज ज्ञानेबा-तुकोबांच्या पालख्यांचे होणार मनोमिलन; ‘या’ मार्गावरील वाहतुकीत मोठे बदल
-‘…तर माझं नाव बदलेन मी’; एक ट्रिलियनच्या मुद्द्यावरुन जयंत पाटलांची विधानसभेत मिश्किल टीका
-पावसाळ्यात आपले स्वास्थ चांगले ठेवण्यासाठी काय खावे काय टाळावे?