बारामती : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या बारामतीमधील एका मतदान केंद्रावर काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पहायला मिळालं. बारामतीमधून उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध त्यांचेच सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांच्यात सामना रंगला आहे. आज मतदानाच्या दिवशी बारामतीमधील खाटीक गल्ली येथील एका मतदान केंद्रावर मतदारांना धमाकवले जात असून अनेक मतदार हे अजित पवारांच्या पक्षाचे चिन्ह घेऊन मतदान करत असल्याचे पहायला मिळाले आहे, असा गंभीर आरोप युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी केला आहे.
‘आमच्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. मतदारांना घडाळ्याचे शिक्के असलेल्या स्लीप वाटण्यात येत आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांकडे आम्ही याची तक्रार करणार आहे’, असे शर्मिला पवार यांनी सांगितले आहे. मतदारांना देखील दमदाटी करण्यात येत असल्याचा आरोप शर्मिला पवार यांनी केला आहे. बारामतीतील बालक मंदिरातील मतदान केंद्रामध्ये हा प्रकार होत असल्याचा आरोप शर्मिला पवार यांनी लगावला आहे.
शर्मिला पवार या मतदान केंद्रात गेल्या होत्या. बाहेर येऊन त्यांनी अजित पवार गटाच्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून आमच्या लोकांना जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. दमदाटी केली जात असल्याचा गंभीर आरोप शर्मिला पवार यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
-पुण्यातील ‘या’ मतदारसंघात ७५०० मतदारांची नावं गायब; मतदारांची आक्रमक भूमिका
-Pune Assembly Election: प्रचाराची वेळ संपली तरीही पुण्यात प्रचार सुरुच!
-जरांगेंचा फोटो अन् मराठा उमेदवार ओळखण्याचं आवाहन, कसब्यात लागलेल्या बॅनर्सची शहरात चर्चा
-महायुतीची एकजूट: हेमंत रासनेंना विजयापर्यंत नेणार; महायुतीचे कार्यकर्ते जोमात