बारामती : ‘मूळचे पवार आणि बाहेरचे पवार वेगळे’, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या. पवार घरातील सून सुनेत्रा पवारांच्या डोळ्यातंही शरद पवारांचं वक्तव्य ऐकून टचकन पाणी आल्याचं पाहायला मिळालं. आता उपुमख्यमंत्री अजित पवारांनी इंदापूरच्या वकीलांच्या आणि डॉक्टरांच्या मेळाव्यात डॉक्टर महिलेचं नाव घेऊन शरद पवारांच्या त्या वक्तव्यावर मिश्किल टोला लगावला आहे.
उपस्थित महिला डॉक्टरांना उद्देशून अजित पवार म्हणाले की, “तुम्ही सून म्हणून आला असला तरी आम्ही तुम्हाला बाहेरच्या म्हणणार नाही, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही आमच्या घरच्या आहात. आमच्या घरची लक्ष्मी आहात’, असं म्हणत शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
“डॉक्टरांशी सगळे खरे बोलतात. त्यामुळे तुम्ही नक्की राजकारणात काय चाललं आहे. आपल्या रुग्णांना विचारा. आमचं नाव घेतलं तर जरा चांगले बोला. जर दुसरे नावं घेतलं तर जोरात इंजेक्शन द्या”, अशी मिश्किल टोलाही अजित पवारांनी यावेळी लगावला आहे.
“वाडप्या घराचा असला की कितीही वाढता येत. आता मी वाढपी आहे. तुम्ही मला साथ द्या मी तुम्हाला साथ देईल. आतापर्यंत तुम्ही खासदाराला निवडून दिले आता महायुतीच्या खासदाराला निवडून दिलं तर त्याची कारकीर्द आजपर्यंत जे खासदार निवडून गेले आहेत त्यांच्या पेक्षा महायुतीचा हा खासदार उजवा असेल”, असा विश्वासदेखील अजित पवारांनी यावेळी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“ईव्हीएमचे बटन कचाकचा दाबा पण, बटन दाबताना हात आखडता घेतला तर माझा पण…”- अजित पवार
-पुणे लोकसभेच्या मैदानात AIMIM ची एन्ट्री! तगडा उमेदवार देत काँग्रेससह धंगेकरांची डोकेदुखी वाढवली
-Shirur Lok Sabha | ‘…तर आज शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू नसते’; मोहिते पाटलांचा शरद पवारांवर निशाणा
-“इथं एकाला तिकीट दिलं आमदार, मंत्री केलं पण….”; शरद पवारांचा दत्ता भरणेंवर निशाणा