पुणे : पुणे शहरात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. शहरात कोयता गँग, खून, दरोडे, हल्ले, गोळीबार, बलात्कार असे गुन्हे सर्रास घडत असतात. त्यातच आता पुण्यातील एका प्रसिद्ध महाविद्यालयातील विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. या पार्श्वभूमीवर शहरामध्ये पुणे शहरामध्ये नव्याने पोलीस स्टेशन तयार करण्यात यावे, तसेच अतिरिक्त १ हजार ७०० पोलीस कर्मचाऱ्यांची उपलब्धता करुन घ्यावी, असा प्रस्ताव पुणे पोलिसांनी राज्य सरकारला दिला होता.
पुणे शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे. शहरात ७ पोलीस स्टेशनला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वर्गीकरण करुन आंबेगाव पोलीस स्टेशन करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. राज्य शासनाने ७ कोटी ९ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून पोलिस स्टेशनसाठी ९८ पद मंजूर करण्यात आली आहे.
हवेली आणि सिंहगड पोलीस स्टेशन हद्दीतील काही भाग वेगळा करून नांदेड सिटी पोलिस स्टेशन तयार करण्यात आले आहे. त्यासाठी ११८ पदे मंजूर करण्यात आले आहे. या नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या निर्मितीसाठी ८.६० कोटीच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. चतु:शृंगी पोलिस स्टेशन येणाऱ्या भौगोलिक भागाचे २ भाग करून बाणेर पोलीस स्टेशन मंजूर करण्यात आले आहे. यासाठी ८.६० कोटींचा निधी आणि ११८पदांना मंजुरी देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पंतप्रधान मोदींची सभा नाही, पण मैदानाची चांगलीच दुरावस्था झाली
-ओबीसी-मराठा कार्यकर्त्यांचा ससून रुग्णालयात राडा; २०-२५ मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल
-जुन्नरमध्ये ठरलं! राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना रंगणार
-‘त्यांच्यासोबत जात मतदान केलं तर तुम्हाला सौ..’; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?