पुणे : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत ओबीसी आरक्षणावरुन भाडपवर आगपाखड केली आहे. पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये ३५० च्यावर ओबीसीच्या जाती आहे जे काही चित्र आपण पाहतोय सरकार ज्यांना भेटते ते ठरलेले काही लोक आहेत त्यांच्या माध्यमातून घेतलेला एक भाजपचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष सांगतात की ५०% च्या वर आरक्षण देता येत नाही असे म्हणत आहेत तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्हाला ५० च्या वरी जाता येते असं सांगतात आहे नेमकी भूमिका काय हे स्पष्ट केली पाहिजे”, असे फडणवीस म्हणाले आहेत.
‘सरकारने मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरू केला असून, हे सरकार जातीयवादी आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू, फुले, आंबेडकरांचा आहे. काळाराम मंदिरात दलितांच्या विरोधात पत्रके आढळून आली आहेत. हे सरकार चातुर्वर्ण्य व्यवस्था आणण्याचा प्रयत्न करत आहे’, असा गंभीर आरोपही नाना पटोले यांनी केला आहे.
जातीनिहाय जनगणना करायला हवी, त्यातून प्रश्न सुटतील. महाविकास आघाडीतील नेत्यांना स्वतःच्या पक्षातील नेत्यांना खुश करण्यासाठी काही वक्तव्ये करायला लागत आहेत. पवारसाहेब एक पाऊल मागे आले तर आम्ही ३ पावले मागे आलो आहे. ३ पक्षातील जागावाटप चर्चेनंतर नक्की होईल. भाषण वेगळे आणि नेत्यांमधील चर्चा वेगळी आहे. आम्ही स्वतःला कधीच मोठा भाऊ म्हणत नाही. आम्ही राजकीय पक्ष आहोत, असे पटोले म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पोलीस भरती मैदानी चाचणीबाबत फडणवीस म्हणाले, ‘पावसामुळे तर मैदानी चाचण्या पुढे पण…’
-पुण्यात डेंग्यू रुग्णसंख्या वाढली; पालिका प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपायोजना
-‘मी बारामतीची जबाबदारी दुसऱ्यांवर दिली होती, पण…’; शरद पवारांचा अजितदादांना अप्रत्यक्ष टोला
-वारकऱ्यांना सर्व सोईसुविधा द्या, हेमंत रासनेंची पालिककडे आग्रही मागणी; शिष्टमंडळासह घेतली भेट
-‘लोकसभेत आम्हाला एकही जागा नाही, आता….’ विधानसभेच्या किती जागांवर आठवलेंनी केला दावा?