Health : पावसाळा हा ऋतू सर्वांनाच आवडीचा वाटतो. पावासाचा आवाज, ओल्या मातीचा खमंग वास आणि आपल्या आजूबाजचा हिरवळीने गजबजलेला परिसर हे वातावरण काही औरच असते. अशात मस्त गरमा गरम भजी, किंवा तळलेले पदार्थ तसेच गरम सूप, चहा असे काही पावसाळ्यात हवे हवेसे वाटते. पण याच हव्याहव्याशा पावसाळ्यातच आजारांनाही तितकेच लवकर आमंत्रण मिळते. अशा काळात गरजेचे असते ते आपल्या आरोग्याची काळजी घेणे.
हा पावसाळा जितका आनंद देतो तितकेच आजारही देतो. पावसामुळे विषाणूजन्य, जिवाणू, बुरशीजन्य, वेक्टर-बोर्न आणि जलजन्य रोगांमुळे होणारे बरेच रोग येतात. या वातावरणामध्ये अन्न आणि पाणी दूषित होण्यापासून अनेक आरोग्य धोके उद्भवू शकतात. त्यामुळे आपल्या आहाराकडे देखील अधिक लक्ष देणे गरजेचे असते.
पावसाळ्यात काय खावे?
हळद:
आपल्या दररोजच्या आहारामध्ये ‘हळदी-दूध’ हे प्राचीन भारतीय पेय एक उत्तम रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे आहे. हळदीमधील सक्रिय घटक कर्क्युमिन, संक्रमणांशी लढण्यास मदत करते आणि आपल्याला निरोगी ठेवते. त्यात अँटीसेप्टिक, अँटीफंगल, अँटीमाइक्रोबियल, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत.
मसाला चहा:
रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या पेयांमध्ये मसाला चहा देखील उत्तम उपाय ठरतो. चहा वनस्पती आणि सुकी काळी मिरी, आले, लवंग, दालचिनी, वेलची आणि तुळशीची पाने यासारख्या मसाल्यांचा चहा पिल्यास फायदेशीर ठरतो. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.
व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ:
व्हिटॅमिन सी असलेल्या अन्नामध्ये लाल मिरची, पपई, लिंबू, टोमॅटो आणि संत्री यांचा समावेश होतो. व्हिटॅमिन सी सर्दी आणि फ्लू, संक्रमणांशी लढण्यास मदत करते, पचन सुधारते, हाडे मजबूत करते आणि इतर अनेक सकारात्मक आरोग्य फायदे आहेत. त्यामुळे असे पदार्थ खावेत.
स्वतःला हायड्रेट करा:
हंगाम कोणताही असो हायड्रेटेड राहणे महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी दररोज भरपूर पाणी, ज्यूस आणि औषधी वनस्पतींनी युक्त पाणी प्या.
पावसाळ्यात काय खाणे टाळावे?
स्ट्रीट फूड:
रस्त्यावरील खाद्यपदार्थ टाळावे, कारण दूषित अन्न आणि जलजन्य रोग होण्याचा धोका जास्त असतो. कारण पावसाळ्यात तापमान आणि हवामानाची परिस्थिती जिवाणू आणि बुरशीच्या वाढीसाठी योग्य ठरते.
तळलेले पदार्थ:
पावसाळ्यामध्ये तळलेले पदार्थ खाणे चांगले नसते. तळलेले पदार्थ खाल्याने गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या उद्भवू शकतात ज्यात अपचन समाविष्ट आहे, गोळा येणे, उलट्या आणि अतिसार. तसेच, तळलेले तेल पुन्हा वापरणे टाळा कारण ते तुमच्या आरोग्यासाठी विषारी असू शकते.
महत्वाच्या बातम्या-
-विधान परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; भाजपच्या ‘या’ नेत्यांची विधान परिषदेवर लागणार वर्णी!
-पुणे ड्रग्ज: शहरातील अनधिकृत पब्ज आणि बारच्या कारवाईवर सौरभ गोखलेची प्रतिक्रिया
-पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल लवकरच खुले होणार, मोहोळांचा दिल्ली दरबारी पाठपुरावा यशस्वी