पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. प्रचारसभांतून राजकीय नेते एकमेकांवर गरळ ओकताना दिसत आहे. प्रचाराला चांगलाच रंग चढताना दिसत आहे. शिरुर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यात प्रचाराची चुरस वाढल्याचं पहायला मिळत आहे.
“कोणतीही निवडणूक म्हटलं की ती गावकी-भावकी भोवती फिरत असते, मात्र देशाचा नेता निवडण्याची निवडणूक भावनिक किंवा अन्य पातळ्यांवर होऊ नये, म्हणून काही नेते आग्रही आहे. निवडून येण्याच्या मेरिटवर जसे तिकीट मिळत आहे. तसेच नेते काम करण्याची क्षमता ओळखून मतदान करण्याचे आवाहन करताना दिसत आहेत. यातूनच लोकसभेची ही निवडणूक गावकी भावकीची नसून देशाचं भवितव्य ठरवणारी आहे”, असं म्हणत शिवाजीराव आढळराव पाटीलांनी अमोल कोल्हेंना टोला लगावला आहे.
“ही निवडणूक गावकी भावकीची नाही. तर देशाचा पंतप्रधान देशाचा नेता ठरवण्याची आहे. आगामी पाच वर्षाच्या काळात देशाचा नेता हा जागतिक पातळीवर आपल्या देशाला कुठे नेऊन ठेवतो. आपली अर्थव्यवस्था कितव्या क्रमांकांवर येईल हा विचार करण्याची आहे. त्यामुळे विचारपूर्वक मतदान करा” असं आढळराव पाटलांनी यावेळी नारायणगावच्या मतदारांना सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“नागरिकांना कायम उपलब्ध राहून काम करणार, हीच माझी गॅरंटी” – आढळराव पाटील
-इंटीमेट सीन्स करण्याआधी अभिनेत्री काय करतात? विद्या बालनने सांगितला तिचा अनुभव
-पाडाला पिकला आंबा!!! उन्हाळ्यात आंबा खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहिती आहेत का?
-“सगळं साहेबांनी केलं, मग मी काय…”, अजित पवारांकडून बारामतीत जोरदार हल्लाबोल
-आढळराव पाटलांचे भोसरीत जोरदार शक्तिप्रदर्शन; जेसीबीतून फुले उधळत नागरिकांकडून जंगी स्वागत