पुणे : महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना राज्यातील महिलांसाठी जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरलेल्या महिलांचे बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे. तसेच राज्यातील महिलांच्या अर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्यासह पोषणातही सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांच्या निर्णायक भूमिकेच्या बळकटीकरणासाठी राज्य शासनाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना राबवली जात आहे. या योजनेद्वारे राज्यातील पात्र महिलांना प्रित महिना १५०० रुपये मिळणार आहेत.
माझी लाडकी बहिण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे?
- योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा.
- लाभार्थ्याचे आधार कार्ड
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (किंवा १५ वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड किंवा १५ वर्षांपूर्वीचे मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला)
- परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल, तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र
- सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा (वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपर्यंत) दाखला, पिवळे व केशरी रेशन कार्डधारकांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट
- बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत अनिवार्य नाही.
- पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि योजनेच्या अटी- शर्तीचे पालन करण्याबाबतचे लाभार्थ्याचे स्वाक्षरीसह हमीपत्र
कोणत्या महिलांना मिळणार योजनेचा लाभ
- लाभार्थी महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक.
- साधारण २१ ते ६० वर्षे वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परितक्त्या आणि निराधार महिला
- कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला
- अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँकेत खाते असणे आवश्यक
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही महाराष्ट्रात राबवण्यात येत असून या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महानगरपालिका क्षेत्रात वॉर्डस्तरावर समिती गठित करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-दारु पिऊन गाडी चालवल्यास मिळणार ‘ही’ मोठी शिक्षा; पुणे पोलिसांचा मोठा निर्यण
-‘भाजपच्या वरिष्ठांकडून फडणवीसांचे पंख छाटण्याचा प्रयत्न’; खासदार अमोल कोल्हे असं का म्हणाले?
-आमदार महेश लांडगेंच्या पाठपुराव्याला यश; जाधववाडी-चिखलीत साकारणार पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय!
-भाजपच्या अमित गोरखेंना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर, तरीही भाजपात निरुत्साहच? नेमकं कारण काय?
-महापालिका रुग्णालयाचा हलगर्जीपणा; डॉक्टर, परिचारिकांचा निष्काळजीपणा गर्भवती महिलेच्या जीवावर बेतला