पुणे : भाजप मंत्री नितेश राणे हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन नेहमीच सतत आक्रमक होत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी नितेश राणे यांच्या हलाल आणि मल्हार मटण यावरुन राज्याच्या राजकारणात मोठा वाद पहायला मिळाला. हिंदुत्वाबाबत इतरांनी घेतलेल्या भूमिकेवर आक्षेप घेताना भाजपचं हिंदुत्व कसं पुढं आहे, हेच सांगण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अशातच आता नितेश राणे राष्ट्रवादी काँग्रेसला डिवचले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांनी फोन आल्यावर ‘जय शिवराय’ बोला, असे म्हटले. यावरुन मंत्री राणे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला डिवलचले आहे. त्यांनी ‘जय शिवराय’ नाही, तर ‘अल्ला हू अकबर’ म्हणावे, असे नितेश राणे म्हणाले आहेत.
‘फोन उचलल्यावर ‘अल्ला हू अकबर’ म्हटलं पाहिजे, ‘जय शिवराय’ नाही. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष औरंग्याच्या विचारावर चालतो. त्यांनी फोन उचलल्यावर ‘जय शिवराय’ बोलू नये. फोन आला, तर राँग नंबर म्हणून ठेवायला लागेल. फोन उचलल्यावर ‘अल्ला हू अकबर’ म्हणा, म्हणजे बरोबर कळले, हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत”, असे म्हणत नितेश राणेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीवर टीका केली आहे.
महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर येथे असलेल्या औरंगजेबाची कबर हटवण्यावरुन आंदोलन करण्यात आलं. यावेळी नितेश राणेंनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पहायला मिळाले. “आमच्या महाराष्ट्रामध्ये औरंग्याची कबर आहे, ती आठवण आम्हाला नको. ही हिंदू समाजाची भावना आहे. ज्या औरंग्याने छत्रपती संभाजी महाराज यांना हाल करून संपविले त्याची कबर कशाला?”, असा संतप्त सवालही नितेश राणेंनी विचारला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पत्नी आमदार तरीही पतीदेवांना विधान परिषदेची लॉटरी, अजितदादांचा पुण्यातील नेत्यांना ठेंगा
-डॉक्टरांकडूनच होतेय परस्पर औषधांची विक्री, FDAची मात्र डोळेझाक, कारवाई कधी होणार?
-‘बरं झालं पक्ष फुटला, अशा पुरुषासोबत मी काम करु शकत नाही’; सुप्रिया सुळेंच्या भाषणाची क्लिप व्हायरल
-‘महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती’, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आक्रमक