पुणे : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तास्थापनेबाबत राजयकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच पुण्यातील महात्मा भिडे वाड्यात ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी आंदोलन तसेच आत्मक्लेष उपोषण सुरु आहे. या आंदोलनास माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भेट देऊन राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालावरुन महायुती आणि केंद्रातील मोदी सरकारला टीकेचे लक्ष्य केले आहे. तसेच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
‘एवढं राक्षसी बहुमत असून देखील महाराष्ट्रात आनंद का नाही. बहुमत मिळून देखील राजभवनात जाण्याऐवजी हे लोक शेतात पूजा-अर्चा करण्यासाठी का जात आहेत. अमावस्येला पूजा अर्चा करण्यासाठी गेले, यावरुन त्यांची मानसिकता दिसून येते, असे म्हणत नाव न घेता एकनाथ शिंदे यांना टोलाही लगावला आहे.
‘योजनांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र विकत घेतला. या घोळात एक मोठा विषय ईव्हीएमचा आहे. माझे मत कोठे जाते हे समजायला हवे, शेवटच्या एका तासात ७६ लाख मतं का वाढली? ईव्हीएमविरुद्ध आणि लोकशाही वाचविण्यासाठी आता मोठं आंदोलन उभारलं जाईल’, असं उद्धव ठाकरेंनी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-…म्हणून प्रशांत जगतापांनी जिल्हाधिकारी कार्यालयात भरले १२ लाख ७४ हजार
-बाबा आढाव यांचं आत्मक्लेश उपोषण; शरद पवारांनी घेतली भेट
-मुख्यमंत्रिपदाबाबतच्या ‘त्या’ चर्चेचा मुरलीधर मोहोळांनी केला खुलासा
-‘कोणत्याही पदाची जबाबदारी दिली तरी…’; सुनील शेळकेंच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा
-पिंपरी, चिंचवड, भोसरीच्या विजयी आमदारांची चंद्रकांत पाटलांनी घेतली सदिच्छा भेट