सासवड : शिवसेनेचे माजी मंंत्री विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली. शिवतारे यांनी मनाला मुरड घालत माघार घेतल्याचं बोलून दाखवलं आहे. सासवडच्या पालखीतळावर मेळावा पार पडला. या मेळ्यावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थिती दर्शवली होती. मेळाव्यापूर्वी विजय शिवतारे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
“मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितल्यामुळे निवडणुकीतून माघार घेतली. निवडणुकीतून माघार घेण्याची माझी मानसिकता नव्हती. निवडणूक लढवण्याची संपूर्ण तयारी झाली होती. कार्यकर्तेदेखील कामाला लागले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यामुळे मला माघार घ्यावी लागली. राज्यातील अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या अपक्ष उमेदवारांमुळे मतांची विभागणी होईल. त्याचा फटका महायुतीच्या उमेदवाराला होऊ शकतो, असं महायुतीच्या नेत्यांना वाटत होतं. आपल्यामुळे महायुतीला आणि मुख्यमंत्र्य़ांना त्रास होऊ नये”, असं विजय शिवतारे म्हणाले आहेत.
“गेली ५ वर्षे वाया गेल्याचा राग आमचा आहेच. पाण्याचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशा प्रकारच्या एकूण १३ मागण्या आहेत या मागण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. जेजुरीसाठी १०० कोटी मिळावेत, अशी मागणी केली होती. ही देखील पूर्ण झाली नाही म्हणून आमचा राग आहे”, असं विजय शिवतारे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-Summer Skin Care Tips: वाढत्या उन्हामुळे त्वचेवर टॅनिग झालंय! करा ‘हे’ घरगुती उपाय
-मतदार जागृतीच्या बोर्डावर ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘नोटा’; एबीव्हीपीकडून आंदोलनाचा इशारा