पुणे : पुण्यातील मावळ मतदारसंघ म्हणजे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचा हक्काचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. शिवसेना पक्षात उभी फूट पडली आणि शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी देखील उद्धव ठाकरे यांना राम राम ठोकत एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. त्यामळे आता उध्दव ठाकरे गटाकडून मावळ मतदारसंघासाठी उमेदवारीची चर्चा सुरू झाली.
मावळ लोकसभा निवडणुकीत आता शिंदे विरुद्ध ठाकरे असा सामना पहायला मिळू शकतो. राष्ट्रवादी पक्षाला संजोग वाघेरे यांनी सोडचिठ्ठी दिली आणि ठाकरे गटाची वाट धरली. त्यामुळे आता संजोग वाघेरे यांना मावळ लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळण्याची चर्चा रंगली आहे.
संजोग वाघेरे यांनी मावळ लोकसभा निवडणुकीची तयारी देखील सुरु केली आहे. मतदारसंघातील गावभेटी, बैठका, कार्यकर्त्यांशी संवाद, तसेच रिक्षांवर असलेले बॅनर, यातून त्यांनी आपली ताकत दाखवण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे श्रीरंग बारणे यांनी देखील ‘मीच उमेदवार’ असल्याची घोषणा केली आहे. मात्र, मावळ लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार कोण असणार याबाबत अद्याप उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कोणतीही माहिती समोर आली नाही.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे पोलिसांची आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई; ६०० किलोंचा ड्रग्ज साठा जप्त
-आम्हाला पक्ष, चिन्ह द्यायचं नाही ही एक दडपशाही नाही का? सुप्रिया सुळेंचा भावनिक सवाल
-लाचप्रकरणी नाव आल्यानंतर मुगुट पाटलांची ‘अभियान’च्या सहायक आयुक्तपदी बदली
-पुण्याचा दादा कोण?; रोहित पवारांच्या बॅनरची राजकारणात मोठी चर्चा
-चारित्र्याच्या संशयावरुन महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न; पतीसह ६ जणांवर गुन्हा दाखल