पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाची तारीख जवळ येत आहे तसा प्रचाराला जोर येताना दिसत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महयुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ सभांमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौटुंबिक वादावरही भाष्य केले. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना सडेतोड उत्तर दिलं आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे यांची मंचर येथे सभा झाली. त्यावेळी भीमाशंकर येथे शरद पवार यांच्या अंगावरून साप गेल्याचे त्यांनी सांगितले.
“भीमाशंकरला आल्यानंतर डिंभे येथील विश्रामगृहात शरद पवार झोपले होते. झोपेत असताना त्यांच्या अंगावरून मोठा साप गेला होता. सापाने त्यांना काही केले नाही, तो अंगावरून निघून गेला. तो दिवस शुभ संकेत असल्याचे सांगितले गेले. त्यानंतर आठव्या दिवशी शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून माझी आई प्रतिभा पवार श्रावण महिन्यात भीमाशंकरला येते, तिची श्रद्धा आहे”, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहे.
“ज्या आई-वडिलांनी आपले बोट धरून चालायला शिकविले, त्यांना ज्या वयात गरज असते, त्यांना या वयात सोडणे चुकीचे आहे. यावर्षीपासून माझ्या आईला कधीच असे वाटू देणार नाही की भीमाशंकरला काही बदल झाला आहे. पण, तिच्या नियोजनात काही बदल होणार नाही” असे सांगत सुप्रिया सुळेंनी टोला लगाविला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मोदींच्या सांगण्यावरुन पुतीनने युद्ध थांबवल्याची जगात मोदींची प्रतिमा; अजित पवारांची स्तुतीसुमने
-‘रवींद्र धंगेकर यांचं काम दाखवा, हजार रुपये मिळवा’; भाजपच्या रासनेंची अनोखी ऑफर
-मुरलीधर मोहोळांसाठी उद्या पुण्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणार
-“मी माझ्या राजकीय जीवनात मोठी चूक केली ती म्हणजे…”; अजित पवार असं का म्हणाले?