पुणे : पुणे विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतीक वारसा लाभलेलं शहर मानलं जात. राज्यातील विविध भागातून तसेच इतर राज्यातूनही अनेक विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत असतात. याच पुण्यात गुन्हेगारीने उच्चांक गाठला आहे. शहरात चोऱ्या, लूटमार, कोयता दहशत, गोळीबार, हत्या, बलात्कार असे प्रकार रोज समोर येत आहेत. पुण्यातील सदाशिव पेठेत असणाऱ्या एका जिममधून रोख रक्कम व किंमती सामान असा एकूण ७३ लाख ३८ हजार ५१५ रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याचा प्रकरा आता उघडकीस आला आहे.
या चोरीचा प्रकार सप्टेंबर २०२२ ते जून २०२३ या कालावधीत सीटी बारबेल क्लब, जिम टीसीजी स्केअर येथे घडला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत कर्वेरोड येथे राहणाऱ्या ६२ वर्षीय महिलेने बुधवारी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी राहुल हरिभक्त, संकेत हरिभक्त, आर्यन हरिभक्त, विवेकानंद एस किसरकर, विनायक केशव बापट, अविनाश आनंद जाधव यांच्यावर आयपीसी ३२३, ४७२,४२८,४५१, ४५३, ४५४, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी यांची सदाशिव पेठेत जिम असून आरोपी त्यांच्या ओळखीचे आहेत. आरोपींनी फिर्यादी यांना वेळोवेळी शिवीगाळ व दमदाटी करुन धक्कबुक्की केली. फिर्यादी यांची जिम बंद असताना आरोपींनी जिममधील किंमती सामान आणि रोख रक्कम चोरून नेले. याबाबत फिर्यादी यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने सीआरपीसी कलम १५६(३) नुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी ६ जणांवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष मोरे करीत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे ड्रग्ज कनेक्शन अंडरवर्ल्ड, दुबईत?; पुण्यात बनवलेल्या ड्रग्जची थेट लंडनला विक्री
-शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना धमकी; धमकी देणाऱ्यांना अटक करण्याची मागणी
-शिक्षण फक्त दुसरीपर्यंतच मात्र, ५ राज्यातला अट्टल ड्रग्जमाफिया अखेर पोलिसांच्या ताब्यात
-१३६ वर्षांनंतर इतिहास घडला! वारसा आजोबा अन् वडिलांचा आता लेकही बनली ‘फायरमन’
-‘अहो पोटी जन्माला येण्यापेक्षा निष्ठेने वागणं खूप महत्त्वाचं’; अमोल कोल्हेंचा अजितदादांवर पलटवार