पुणे : पुणे शहरात दररोज गुन्हेगारीच्या एक ना अनेक घटना कानावर पडत आहेत. त्यातच आता धनकवडी परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. हातउसने घेतलेले पैसे परत न केल्याने शिवीगाळ करून त्रास दिल्याने तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना धनकवडी भागात घडली. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आजिनाथ सर्जेराव लोखंडे (वय ४२, रा. धनकवडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. अजितनाथ लोखंडे यांचा भंगार माल खरेदी व्यवसाय होता. व्यवसायासाठी त्यांनी आरोपींकडून हातऊसने पैसे घेतले होते. व्यवसायातील मंदीमुळे लोखंडे यांना पैसे परत करण्यास उशीर केल्याने आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. त्यांना मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. आरोपींनी दिलेल्या धमकीमुळे लोखंडे तणावाखाली होते.
रामदास काशिनाथ त्र्यंबके (रा. बाभळगाव, ता. माढा, जि. सोलापूर), व्यास गुलाब यादव (रा. कात्रज), मयूर विलास साळुंखे (रा. धनकवडी) यांनी अजिनाथ लोखंडेंना धमकावले आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सारिका आजिनाथ लोखंडे (वय ३८) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपींच्या धमकीमुळे लोखंडे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे लोखंडे यांची पत्नी सारिका यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक रेश्मा साळुंखे या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-तुमच्याही नळाला पाणी येत नाहीये???; आता घरबसल्या करता येणार तक्रार
-पुणे ड्रग्ज रॅकेट: दिल्लीत अटक केलेल्या ३ आरोपींना रात्री पुण्याला आणलं
-पुण्यात देशातील सर्वात मोठे ड्रग्ज रॅकेट; सांगलीतून गोव्याला पुरवले जायचे ड्रग्ज
-नवा पक्ष, नवे चिन्ह, शरद पवार रायगडावर तुतारी वाजवत लोकसभेचे रणशिंग फुंकणार
*दररोजच्या नवनवीन घडामोडी मिळवण्यासाठी आजच आपला व्हाट्स अप ग्रुप जॉईन करा*
https://chat.whatsapp.com/GR5EULHUy7UHWhaCvwV111