पुणे : पोलीस दलात अनेकदा वर्दीचा माज दाखवत अनेक भ्रष्टाचार करणाऱ्या पोलिसांनी आपली नोकरी गमवली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरातही पोलीस खात्यातील बेशिस्तपणा समोर आला आहे. पोलीस खात्याचा गैरफायदा घेत कायद्याचे रक्षणकर्ते लालचेमुळे कधी भक्षक बनतात हे सर्वसामान्यांना समजण्या पलिकडचे आहे. पुणे शहर पोलिसांनी आणखी एक कारवाई करत ३ पोलीस कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे.
नाशिक-मुंबई महामार्गावरील दिवे गावात कार अडवून पोलीस असल्याचे सांगून गाडीतील हवालाचे ४५ लाख रुपये लुटणार्या पुणे शहर पोलीस दलातील ३ कर्मचार्यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. अप्पर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील यांनी ही कारवाई केली आहे.
पोलीस शिपाई गणेश मारुती कांबळे, गणेश बाळासाहेब शिंदे, दिलीप मारुती पिलाणे अशी बडतर्फ केलेल्या पोलिसांची नावे आहेत. ते सर्व जण दत्तवाडी पोलीस ठाण्यात नेमणूकीला असताना ८ मार्च २०२२ रोजी सकाळी भिवंडीजवळील दिवे गावात ही घटना घडली होती. तिघांविरुद्ध नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात येऊन विभागीय चौकशी केली जात होती. त्यात दोषी ठरल्याने त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.
जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला असताना अटक चुकविण्यासाठी गणेश कांबळे याने आजारी नसताना पोलीस निरीक्षकांची दिशाभूल करुन सीक पास मिळविला. साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी विनापरवाना मुख्यालय सोडून भिवंडीत जाऊन गंभीर गुन्हा केला. गणेश शिंदे याने प्रशिक्षण काळात साप्ताहिक सुट्टी मिळाली नाही म्हणून साप्ताहिक सुट्टी घेतो, असे खोटे कारण दाखवून सुट्टी घेऊन भिवंडीला जाऊन गुन्हा केला. दिलीप पिलाणे यानेही पर्यायी साप्ताहिक सुट्टी घेऊन भिवंडीला जाऊन गुन्हा केल्याचे विभागीय चौकशीत सिद्ध झाले. त्यामुळे समाजात पोलिसांची प्रतिमा मलिन झाली असं सांगत त्यांना पोलीस सेवेतून बडतर्फ केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘लोकांपर्यंत चिन्ह पोहचवा, विश्वास द्या यश, नक्की मिळेल’; शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना
-“आम्ही कोणाचाही पक्ष चोरला नाही, संसदेत भाषणं ठोकून कामं होत नाहीत”
-मनोज जरांगेंची प्रकृती गंभीर; आक्रमक आंदोलकांकडून पुण्यात ठिकठिकाणी चक्काजाम
-‘घर वडिलांच्या नावावर असताना तुम्ही वडिलांना घराबाहेर काढणार का तुम्ही?’; सुळेंचा दादांना टोला
-कुलकर्णी राज्यसभेवर तर लोकसभेसाठी मुळीकांच्या आशा पल्लवीत; काय असेल भाजपचा निर्णय?