पुणे : पश्चिम महाराष्ट्रातून मुबईच्या दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे पुणे शहरात मोठी वाहतूक कोंडी होताना दिसते. या वाहतूक कोंडीमुळे पुणेकरांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या वाहतूक कोंडीवर उपाय योजना म्हणून पुणे वाहतूक पोलिसांनी वाहतुकीच्या नियमात बदल करण्यात आले आहेत.
पुण्यात उद्या ५ मार्च रोजी जड वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. पुणे-अहमदनगर, पुणे-सोलापूर, पिंपरी-चिंचवड पुणे शहर या मुख्य मार्गांवर जह वाहनांना पुर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. पुण्यात उद्यापासून जड वाहनांना नो एन्ट्री असणार आहे. पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
पुणे शहरात पिंपरी-चिंचवड, मुंबई ,सातारा ,सोलापूर या शहरातून पुण्यात येणाऱ्या जड वाहनांना २४ तास बंदी असणार. वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. जड वाहनांना पुण्यातून बाहेर पडण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
प्रवेश बंदी असल्याने नियमांचं उल्लंघन केल्यास दंड किंवा कारवाई करण्यात येणार आहे. पुणेकर आधीपासूनच वाहतूक कोंडीची समस्येला सामोरे जात आहेत. त्यातच आता शहरात सध्या पुणे मेट्रो आणि उड्डाणपुलांची कामे सुरु असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र आता नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पुणे वाहतूक पोलिसांनी जड वाहनांच्या बंदीचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-ड्रग्ज रॅकेट: पुणे पोलिसांकडून विश्रांतवाडीत एमडीसाठी लागणारा ३६० किलो कच्चा माल जप्त
-“अजितदादा हळूच मला गृहखातं मागतील पण मी ते माझ्याकडेच ठेवणार”; फडणवीसांचा मिश्किल टोला
-“छत्रपती संभाजी महाराज एकही ‘निवडणूक’ हरले नव्हते”; अजित पवारांकडून भाषणात झाली चूक
-कसबा गणपती मंदिरात जाताना ‘या’ गोष्टी लक्षात घ्याच; पाळावे लागणार आहेत नियम
-ड्रग्ज प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाला अटक; ४५ कोटी रुपयांचे एमडी जप्त