पुणे : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर केंद्रात एनडीएची सत्ता आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील मंत्र्यांचा शपथविधी सोहळा रविवारी दिल्लीतील राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणामध्ये पार पडला. एकूण ७२ खासदारांना मंत्रीपद आणि राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली. मात्र, यामध्ये महाराष्ट्रातील केवळ ६ खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला एकही मंत्रीपद देण्यात आले नाही. यावरुन महायुतीतील सरकार स्थापन होऊन २४ तास उलटाण्याआधीच मंत्रीपदावरून नाराजीनाट्य सुरू झाल्याचे पहायला मिळाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार आण्णा बनसोडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
एनडीए सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यानंतर आता अजित पवार गटाने देखील अन्याय केला असल्याचे बोलून दाखवले आहे. “अजित पवार गटाला एक कॅबिनेट मंत्री पद द्यायला हवं होतं. इतर राज्यातील घटक पक्षाच्या तुलनेत महाराष्ट्रातील घटक पक्षावर अन्याय झाला आहे”, असे अण्णा बनसोडे म्हणाले आहेत.
“अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याचा जो निर्णय घेतला. वास्तविक त्यांनी एवढा मोठा विरोध पत्कारून भाजपसोबत गेले. खरंतर पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना सगळ्याची कल्पना होती. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला ४ जागा दिल्या, त्यापैकी सुनील तटकरे यांची एक जागा निवडून आली, तर प्रफुल पटेल हे अगोदरच राज्यसभेवर खासदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रफुल पटेल यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळेल, अशी आशा होती. मात्र, राष्ट्रवादीला कॅबिनेट मंत्रीपद मिळाले नाही. याबद्दल राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराजी व्यक्त करत आहेत”, असे अण्णा बनसोडे यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘…अन् थेट मंत्रिपदाची माळ तुझ्या गळ्यात’; प्रवीण तरडेंनी मोहोळांसाठी केली खास पोस्ट
-“हे तुमच्या पचनी पडणारे नाहीच…” मंत्री मुरलीधर मोहोळांनी सुप्रिया सुळेंना सुनावलं
-सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर खासदार करत केंद्रात मंत्रिपद द्या, राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी मागणी
-‘मैं दुसरों के घर मे क्यू झांकू’; सुप्रिया सुळेंचा निशाणा कोणाकडे?
-फेलोशिपसाठी मराठी विद्यार्थ्यांचा लढा; ‘सारथी’ पीएचडीच्या विद्यार्थ्यांकडून कार्यालयासमोर आंदोलन