पुणे : पुणेकरांवर झिकाचं संकट वाढत असल्याचे दिसत आहे. पुण्यात अतिमुसळधार पाऊस आणि पूरपरिस्थितीनंतर पुणेकरांवर झिकाचे संकट कायम आहे. शहरामध्ये झिकाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. एका दिवसात तब्बल ८ रुग्णांची नव्याने नोंद झाली आहे. शहरात सध्या एकूण रुग्णासंख्या ८१ वर पोहचली आहे. आतापर्यंत झिकाच्या ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
शहरात एका दिवसात ८ रुग्ण आढळले असून यापैकी ७ गर्भवती महिलांचा समावेश असल्याचे पुणे महानगरपालिकेच्या अहवालातून समोर आले आहे. जूनपासून शहरामध्ये झिकाचे रुग्ण आढळून येऊ लागले. एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘आतापर्यंत ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, परंतु झिका संसर्गाव्यतिरिक्त ते सर्व इतर अनेक आजारांनी ग्रस्त होते.’
झिका लागण झालेल्या रुग्णांपैकी २६ गर्भवती महिलांचा देखील समावेश असून सुदैवाने त्यापैकी काही महिलांची प्रकृती आता ठिक आहे. या वर्षी २० जून रोजी शहरात झिका विषाणू संसर्गाची पहिली घटना नोंदवली गेली. झिकाचा धोका वाढत असल्याने पुणेकरांना विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात पुन्हा पूरस्थिती; मुख्यमंत्र्यांच्या आदेश येताच शिवसेना धावली नागरिकांच्या मदतीला!
-पर्वतीत यंदा काँग्रेसचाच आमदार! आबा बागुलांना विश्वास; नाना पटोलेंच्या भेटीनंतर पोस्ट करत म्हणाले….
-Pune: पुराच्या पाण्याखाली गेलेल्या वाहनांना मिळणार इन्शुरन्स; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश
-सावधान! पुण्यात पुन्हा पूर; खडकवासला धरण ६५ टक्क्यापर्यंत खाली करण्याचे पालकमंत्र्यांच्या सूचना
-Pune: काँग्रेसमध्ये शहराध्यक्ष बदलावरुन वाद; अरविंद शिंदे म्हणाले ‘मी त्यांच्याशी…’