पुणे : सध्या व्हॅलेनटाईन वीक सुरु असून जगभरात आपल्या प्रेयसी, प्रियकरांसोबत व्हॅलेनटाईन वीक सेलिब्रेट केले जातात. या दिवसांमध्ये प्रेम व्यक्त करताना अनेक दुर्घटना घटनाही घडत असतात. या पार्श्वभूमीवर काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून कॅफेमध्ये वेशांतर करुन गेले असता धक्कादायक प्रकार समोर आला. प्रेमाच्या नावाखाली कॅफेमध्ये तरुणाई अश्लिल चाले करताना पहायला मिळाले. कॅफेमध्ये अश्लिल वर्तन करण्यास मुभा देणाऱ्या शहरातील रेव्हन्यू कॉलनीतील ‘द स्टीम रुम कॅफे’वर पोलिसांनी कारवाई केली आहे.
तरुण-तरुणींना कॅफेमध्ये अश्लिल वर्तन करण्यास मुभा देणाऱ्या ऋषीकेश रामदास ढवळे वय २३ वर्ष रा. ढवळगाव ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर याचे विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना शिरूर शहरातील वेगवेगळ्या कॅफे चालकांनी त्याचे कॅफे हॉटेलमध्ये अवैध पार्टीशन केल्याने शाळेतील आणि कॉलेजमधील विद्यार्थी, विद्यार्थीनी हे असभ्य, अश्लील वर्तन करत असल्याची माहीती पोलीस निरीक्षक संदेश केजळे यांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीवरुन महिला पोलीस हवालदार जाधव पो. कॉ. शिंदे, पो. कॉ. थोरात, पो. कॉ आव्हाड यांनी वेषांतर करुन रेव्हेन्यू कॉलनीमधील ‘द स्टीम रुम कॅफे’मध्ये नाष्टा करण्यात बसले असता त्यांना काही मुले, मुली पहायला मिळाली. ही मुले, मुली कॅफेमध्ये पार्टीशन केलेल्या रूमध्ये बसून असभ्य व अश्लील कृत्य करताना दिसले. शाळकरी मुला-मुलींना अश्लिल वर्तन करण्यास मुभा दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे याचे मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार साबळे हे करत आहेत.
दरम्यान, बदललेल्या काळात शाळकरी मुले, मुली शिक्षणाकडे दुर्लक्ष करुन प्रेमाच्या नावाखाली अश्लिल चाळे करताना पहायला मिळत आहेत. त्यामुळे अशा कॅफेंवर बंदी घालावी तसेच शाळकरी मुलांच्या पालकांनी आपल्या मुलांवर अधिक लक्ष देणं गरजेचं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-वराती मागून घोडे: ‘जीबीएस’ उद्रेकानंतर राज्य सरकारला आली जाग! शुद्ध पाण्याबाबत उचललं मोठं पाऊल
-पुण्यातून सुरुवात देशभरात पसरली पाळेमुळे, ११९६ कोटींच्या घोटाळ्याचे पुणे कनेक्शन
-‘राजकारणाचा पोरखेळ कोणी केला’ दिल्लीतील ‘त्या’ कार्यक्रमावरुन पुण्यात वादंग, नेमका काय प्रकार?
-पुण्यात शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ला ब्रेक, कमिटमेंटमुळे रखडला माजी आमदाराचा प्रवेश?
-मनसेच्या इशाऱ्यानंतर भाडिपाचा पुण्यातील ‘तो’ शो रद्द; सारंग साठ्ये म्हणाला, ‘आगीत तेल…’