पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोसरीमध्ये आमदार महेश लांडगे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या मैदानावर निवडणूक नियोजनाबाबत भोसरीमधील ग्रामस्थ आणि सहकाऱ्यांची बुधवारी बैठक घेतली. या बैठकीला सभेप्रमाणे गर्दी झाल्याचे पहायला मिळाले. यावेळी बोलताना आमदार महेश लांडगे यांनी भोसरीत राहण्याची लाज वाटते असं म्हणणाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.
“आपण राजकारणात आहोत. तुम्ही मला बदनाम करा. मात्र, एवढी पातळी सोडू नका. ज्या गावात आपण राहतो. त्या गावाला बदनाम करु नका. आपण ज्या संस्कारात, विचारांत वाढतो. त्याचा अनादर करु नका. कुठेही बोलताना भोसरीबद्दल आपल्याला आदरच पाहिजे. भोसरी माझा स्वाभिमान आहे. माझ्या स्वाभिमानाला कोणी धक्का लावेल, तर त्याला जश्यास तसे उत्तर देणार आहे. निवडणूक जिंकण्यासाठी घाणेरडे राजकारण सुरू आहे. भोसरीच्या मातीत समोरच्याला उचलून टाकणारे पैलवान तयार होतात. समोरच्याला चावणारे नाही. मलाही लाज वाटते, तुमच्यासारखी माणसे भोसरीत जन्माला आली”, असे महेश लांडगे म्हणाले आहेत.
“१० वर्षांत काय केलं?, असा प्रश्न विचारणाऱ्यांना मी सांगणार आहे. शास्तीकर सरसकट माफ झाला आणि तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय त्याचे लाभार्थी आहेत. आतापर्यंत मी कुणाचे नाव घेतले नाही. मात्र, आता भर चौकात नाव घेवून सांगणार कुणाचा किती शास्तीकर माफ झाला. ‘भोसरीत राहण्याची लाज वाटते’ असा आरोप तुम्ही केला. त्यामुळे आम्हा भोसरीकरांचा स्वाभिमान दुखावला आहे. मी माफ केले असते. पण, माझ्या भोसरी गावचे नाव बदनाम करायला नको होते”, अशी सडकून टीका आमदार लांडगे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अजितदादांचा शिलेदार शांत बसेना! मावळात शेळकेंची डोकेदुखी काय?
-पुण्यातील ‘या’ चार मतदारसंघाचा पेच काही सुटेना! महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी
-ईडीची मोठी कारवाई; मंगलदास बांदलांची कोट्यावधींची मालमत्ता जप्त
-कसब्यात इच्छुकांकडून ब्राह्मण कार्डची खेळी, भाजप बहुजन उमेदवार डावलणार का? राज्यात वातावरण तापणार
-खडकवासल्यात राजकीय राडा; महायुतीच्या सेना-भाजपचे इच्छुक आमने-सामने, अन् पुढे काय घडलं?