पुणे : गेली दोन दिवसांपासून सुरू असणाऱ्या अतिमुसळधार पावसामुळे पुणे शहरातील जनजीवन विस्कळीत झाल आहे. खडकवासला धरणक्षेत्रातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील अनेक भागामध्ये सोसायट्या तसेच घरांमध्ये पाणी शिरले असून प्रशासनाकडून घाबरुन न जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या युद्धजन्य परिस्थितीमध्ये पालकमंत्री अजित पवार यांनी जागेवर जात प्रत्यक्ष पाहणी करत आढावा घेतला. आता पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे दिल्लीहून पुण्याकडे रवाना झाले आहेत.
अर्थसंकल्पीय अधिवेशन सोडून मुरलीधर मोहोळ हे पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. पावसाची स्थिती आणि हवामान विभागाचा अंदाज लक्षात घेऊन मोहोळ पुण्याच्या दिशेने येत आहेत. पुण्यात येताच मोहोळ पूरग्रस्त भागाचा आढावा घेणार आहेत. पुण्यातील संगमवाडी, पाटील इस्टेट, पुलाची वाडी, आणि सिंहगड रोड परिसरातील पूरपरिस्थीतीचा त्यांच्याकडून आढावा घेण्यात येईल. महापालिका आपत्ती नियंत्रण कक्षालाही भेट देणार असल्याचीही माहिती मिळत आहे.
विसर्ग पुन्हा ४० हजार क्युसेकवर…
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा १५ हजार क्युसेक विसर्ग वाढवून ६ वाजल्यापासून ४० हजार क्यूसेक करण्यात येत आहे. या संदर्भातील माहिती नागरिकांना देण्यात येत असून नागरिकांनीही सूचनांचे पालन करावे, ही विनंती !… pic.twitter.com/ULTIzyw3s4
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) July 25, 2024
दरम्यान, शहरात अनेक भागात पूरपरिस्थीती निर्माण झाली असून अनेकांचे संसार पाण्यात बुडाले आहेत. पुण्यात पावसाचा जोर कायम असून पुणेकरांना घाबरुन न जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पूरग्रस्त भागामध्ये बचावकार्यासाठी NDRFचे जवान तैनात असून त्यांच्याकडून पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे कार्य सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात येताच अजित पवार अॅक्शन मोडमध्ये; अधिकाऱ्यांना दिल्या महत्वाच्या सूचना
-पुण्यात पावासाचा हाहाकार! कामाशिवाय घराबाहेर पडू नका; पालकमंत्री अजित पवारांचे नागरिकांना आवाहन
-संघटनेतून काढलं पण शेतकऱ्यांच्या मनातून कसे काढणार? रविकांत तूपकरांचा राजू शेट्टींवर घणाघात