पुणे : भारतातील पहिला सार्वजनिक गणपती बाप्पा असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची श्री गणेश अभिषेक सेवा यंदापासून सुरु होणार आहे. भाविकांना ऐच्छिक देणगीच्या माध्यमातून ही सेवा मिळणार असून त्यासाठी नाव नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’चे उत्सवप्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन यांनी ही माहिती दिली आहे.
गेल्या १३३ वर्षांपासून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचा उत्सव साजरा होतो. त्यानिमित्ताने ट्रस्टकडून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. मात्र, उत्सवात श्री गणेशाची अभिषेक सेवा अद्यापपर्यंत सुरु करण्यात आली नव्हती. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षापासून भाविकांकडून अभिषेक सेवा सुरु करावी’, अशी मागणी वारंवार केली जात होती. भाविकांच्या या मागणीचा मान राखत अखेर ट्रस्टने यावर्षीपासून अभिषेक सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पुनीत बालन यांनी सांगितले आहे.
१० दिवसांच्या उत्सव कालावधीत सकाळी ६ ते सकाळी ११ या वेळेत भाविकांना बाप्पाचा अभिषेक करता येणार आहे. त्यासाठी आधीच नाव नोंदणी करुन वेळ निश्चित करता येणार आहे. त्यासाठी ९११२२२१८९२ या संपर्क क्रमांकावर अथवा http://bit.ly/abhisheksbtrgt या संकेत स्थळावर नाव नोंदणी करता येणार आहे.
तसेच नाव नोंदणी करू शकले नाहीत अशा भाविकांना थेट उत्सव मंडपात नाव नोंदणी केलेल्या भाविकानंतर उपलब्ध वेळेनुसार अभिषेक करता येईल. महत्त्वाचे म्हणजे या श्री. गणेश अभिषेकासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क निश्चित करण्यात आलेले नसून भाविकांना ऐच्छिक देणगी देऊन अभिषेक करता येणार आहे. केवळ पंजामृत आणि पेढ्यांचा प्रसाद भाविकानी सोबत आणावे लागणार आहे. सोबत दिलेल्या संपर्क क्रमांकावर अथवा संकेत स्थळावर नाव नोंदणी करावी, असे आवाहन ट्रस्टकडून करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अमोल कोल्हेंनी लोकसभेत केली बिबट्याच्या नसबंदीची मागणी; मनेका गांधी म्हणाल्या, ‘त्यापेक्षा..’
-‘देवेंद्र फडणवीस आमचे शत्रू नाहीत, पण…’; जरांगे पाटलांचं वक्तव्य
-खडकवासल्यावर शिंदेंच्या शिवसेनेचा दावा; भीमराव तापकीरांची डोकेदुखी वाढली!
-सुप्रिया सुळे म्हणाल्या ‘दूधवाला पण लवकर उठतो’, अजितदादांचं सणसणीत उत्तर; म्हणाले…