बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे १ लाख ५३ हजार ९६० मताधिक्याने दणदणीत विजय मिळवत महायुतीच्या सुनेत्रा पवार यांचा पराभव केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महायुतीत सामील झाल्यानंतर पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामतीमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. बारामती मतदारसंघात दोन्ही गटांकडून मतदारांना भावनिक करण्याचा प्रयत्न केला. अशातच बारामतीच्या जनतेने शरद पवारांसोबत राहणार असल्याचे या निकालातून दाखवून दिले आहे.
अजित पवारांनी सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सर्व सभांमध्ये सुनेत्रा पवारांचा विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. त्यानंतर जाहीर झालेल्या निकालात सुनेत्रा पवारांचा पराभव झाल्याने अजित पवारांचा सुप्रिया सुळे गटाकडून डिवचण्यात आले. अजित पवार तर निकालादिवशी सोशल मीडियावर ट्रेंडींगमध्ये होते.
निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच सुप्रिया सुळे पुण्यात आल्यानंतर यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी, उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना उद्देशून घोषणाबाजीही करण्यात आली. ‘दादांना सांगा ताई आली… ‘ असे म्हणत पुण्यातील सुप्रिया सुळे समर्थकांनी मोठा जल्लोष केला. सुप्रिया सुळेंना विजयाच्या गुलालाने रंगवण्यात आलं होतं. यावेळी, सुप्रिया सुळे यांच्यासह समर्थकांच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद स्पष्टपणे झळकत असल्याचे दिसून आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-बारामतीच्या पराभवानंतर अजित पवारांचा मोठा निर्णय; युगेंद्र पवारांची ‘या’ पदावरुन हटवलं
-अजित पवार गटाच्या महत्वाच्या बैठकीला अनेक आमदारांची दांडी! शरद पवार गटात परतणार?
-…म्हणूनच आढळराव पाटलांना शिरुरमध्ये पराभव झाला? भोसरीमधून ९ हजारांपेक्षा जास्त मताधिक्य तरीही हार
-अजित पवारांना एकच जागा; शरद पवार म्हणाले, ‘त्यांच्या राष्ट्रवादीचे भविष्य…’