पुणे : बारामती लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीच्या सर्व नेत्यांनी प्रचारसभे घेतल्या आहेत. सुनेत्रा पवार यांनी मतदारसंघातील प्रत्येक गावांमध्ये भेटीगाठी देत आहेत. त्यामध्ये अनेकदा त्यांनी आम्हाला साथ द्या विकास नक्की करु , असं म्हणत मतदान करण्याचं आवाहन करताना दिसत आहे.
“माझ्या सामाजिक कार्याची सुरुवातच मी काटेवाडी गावातून केली आहे. त्यामुळे मला गावापासून शहरापर्यंतच्या प्रश्नांची जाण आहे. या प्रश्नांची सोडवणूक करणं ही माझी जबाबदारी आहे. या जबाबदारीची जाणीव ठेवूनच मी काम करत राहीन”, असे आवाहन सुनेत्रा पवार यांनी बारामतीकरांना दिली आहे.
“सामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी हा अजितदादांचा आग्रह असतो. त्यांच्या कामाचा आवाका आणि पद्धत ही संपूर्ण महाराष्ट्राला अवगत आहे. त्यामुळेच बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास हाच मुद्दा घेवून मी ही निवडणूक लढवत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकाधिक प्रश्नांची सोडवणूक करण्यावर आपला भर असेल”, असेही सुनेत्रा पवार यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“कधी कधी वाटतं २००४ मध्येच हे करायला पाहिजे होतं”; इंदापूरच्या सभेत अजित पवारांचं वक्तव्यं
-‘कोणी तुमचा ऊस नेला नाही तर हाय पठ्ठ्या ऊस न्यायला, अन् भाव पण चांगला देईल’- अजित पवार
-Lok Sabha | ऐन लोकसभा निवडणुकीत पुण्यात ३० लाखांचा मुद्देमाल जप्त