मावळ : लोकसभा निवडणुकीच्या निकालाला आता फक्त काहीच तास शिल्लक राहिले आहेत. उद्या ४ जून रोजी राज्यातील निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. मावळ लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला होता. या निवडणुकींच्या एक्झिट पोलनुसार मावळमध्ये शिंदे गटाचे श्रीरंग बारणे हे आघाडीवर तर ठाकरे गटाचे संजोर वाघेरे हे पिछाडीवर असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचे मावळचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी आज पुन्हा एकदा १ लाख ७२ हजारांच्या मताधिक्याने निवडणून येण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. २०१९मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यावेळी शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आणि पार्थ पवार, अजित पवारच बारणेंचा प्रचार करु लागले. त्यातच पार्थ पवारांच्या पराभवाचाही संजोग वाघेरे यांनी उल्लेख केला आहे.
‘दोन्ही वेळेस पक्षाचा आदेश असल्याने थांबलो. अखेर शिवसेना ठाकरे गटाने माझ्यावर विश्वास दाखवला आहे. मतदारसंघातून मोठा प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेला. विरोधकांनी गद्दारी केली हे लोकांना पटलं नाही. अजित पवारांनी मला ठाकरे गटात पार्थचा बदला घेण्यासाठी पाठवले नाही. तसे अजित पवार यांच्याशी बोलणं झालं नाही. पण, २०१९ ला राष्ट्रवादीचा शहराध्यक्ष होतो. ज्या उमेदवाराचे आपण काम केले. त्याला निवडून आणता आले नाही. याची चीड निश्चित आहे. बारणे जिंकतील हा जर तर चा प्रश्न आहे. उद्या कळेल कोण जिंकेल. मला विश्वास आहे महाविकास आघाडी जिंकेल”, असे संजोग वाघेरे म्हणाले आहेत. संजोग वाघेरे हे आज पिंपरीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“लोकसभा निवडणूक हा एक वेगळा अनुभव आहे. एवढी मोठी निवडणूक ही माझ्या जीवनात पहिलीच आहे. २०१४ पासून लोकसभा लढवायची हे ठरवले होते. माझे काही मित्र खासदार आणि आमदार झाले, मलाही वाटले आपणही व्हावे. मतदारसंघातील अपेक्षा आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया बघितल्यानंतर महाविकास आघाडीचा विजय होईल”, असा विश्वास संजोग वाघेरे यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-संपूर्ण देशाचं लक्ष बारामती निकालाकडे; सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार बारामतीच्या खासदार?
-अरुण गवळीच्या सुटकेनंतर राजकीय पक्षांची साद; शिंदे-फडणवीस लागले तयारीला
-मोबाईल माणसाचं आयुष्य; याच मोबाईलचा आपल्या मेंदूवर कसा परिणाम होतोय?
-शिरुरचा खासदार कोण? आढळराव पाटील मागील पराभवाचा वचपा काढणार का?
-शनिवारवाड्यात बाॅम्बची अफवा पसरविणाऱ्या बीडमधील तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल