पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूने जनतेने कौल दिल्यानंतर आता महाविकास आघाडीतील सर्व पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यातच पुणे शहरातील मतदारसंघामधील पक्षाची ताकद, उपलब्ध सशक्त उमेदवार, जिंकून येण्याची खात्री, अशा विविध निकषांवर शहरातील ८ पैकी ६ विधानसभा मतदासंघांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार उभे करावेत, अशी मागणी शरद पवार गटाकडून पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आली आहे.
मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत एकत्र लढण्याची भूमिका व्यक्त केली. असे असतानाच पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून ही मागणी करण्यात आली आहे. पक्षाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत शहरातील ८ ही मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. मात्र, शरद पवार गटाकडून करण्यात आलेल्या मागणीवरुन महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुणे शहरात पक्षाची असलेली ताकद, उपलब्ध असलेले सशक्त उमेदवार, जिंकून येण्याची खात्री, अशा अनेक निकषांवर शहरातील हडपसर, वडगाव शेरी, खडकवासला, शिवाजीनगर, पर्वती, पुणे कँटोन्मेंट या ६ मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येणार असल्याचा विश्वास सर्वानुमते व्यक्त करण्यात आला. असा अहवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पाठवला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-रवींद्र वायकरांच्या नातेवाईकांने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन; तपासात धक्कादायक माहिती
-‘भाजपचा अजिंक्यपणा फोल, हे सरकार किती दिवस चालेल? हा मोठा प्रश्न’; उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा
-केंद्रीय राज्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर मोहोळ पहिल्यांदाच पुण्यात; विमानतळावर जंगी स्वागत