पुणे : बारामती लोकसभा निवडणुकीचा प्रचाराला चांगलाच रंग चढला आहे. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी महायुच्या सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी त्यांची मुलगी रेवती सुळेसह पवार कुटुंबातील सगळे सदस्य मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. त्यातच सुप्रिया सुळे या खडकावासला मतदारसंघात बोलताना त्यांनी अजित पवारांवर टीका केली.
“उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे राज्य कणखर नेता आणि विरोधी पक्षनेता म्हणून पाहत होतं. आता जे अजित पवार दिसत आहेत ते अजित पवार नाहीत. आताच्या अजित पवारांचे भाषणं ऐकले की आश्चर्य वाटतं”,अशी टीका सुप्रिया सुळेंनी अजित पवारांवर केली आहे. त्या आज पुणे दौऱ्यावर आहेत.
“महायुतीच्या सगळ्या नेत्यांना मिळून पवार साहेबांना संपवायचा आहे. चंद्रकांत पाटील बारामतीत आले होते. त्यावेळी त्यांनी हे बोलून दाखवलं होतं. हे सगळं पवार साहेबांना संपवण्यासाठी षडयंत्र सुरु आहे. महायुतीकजून जी कृती केली जात आहे. त्याने शरद पवारांना त्रास द्यायचा आहे, हे सिद्ध होत आहे. शरद पवारांना संपवायचं आहे. हाच अजेंडा घेऊन विरोधक कामाला लागले आहे” असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
“कदाचित बहिणीचं प्रेम कमी पडलं असेल. दुर्दैव आहे की सगळेच नात्यांमध्ये अडकले आहेत. मी पहिला देश मग राज्य मग पक्ष मग नाती. मी नात्यांसाठी राजकारणात आले नाही तर मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आहे. दादा असं बोलतात याचा मला आश्चर्य वाटतं. आमच्याशी घटस्फोट होऊन सात महिने झाले. १८ वर्ष एका संघटनेत आम्ही काम केलं आहे”, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे मेट्रो धावतेय सुसाट! प्रवासी, उत्पन्न वाढले, पण प्रवाशांनी केली ‘ही’ मोठी तक्रार
-‘एका ठोक्यात २ तुकडे करण्याची माझ्यात धमक’; अजित पवारांचं वक्तव्य
-सुनेत्रा पवारांच्या सोबतीला सर्जा-राजाची जोडी! बैलगाडीतून मिरवणूक काढत गावकऱ्यांकडून स्वागत
-‘आपला शब्द म्हणजे शब्द, राहुल कुल राष्ट्रवादीत येऊ द्या, उद्याच मंत्री करतो’; अजित पवारांचं वक्तव्य