पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आपल्या उमेदवारांची पहिली यादी आज घोषित करण्यात आली. महाराष्ट्रातील एकूण 45 उमेदवारांच्या नावांची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्यामध्ये केली आहे. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आले आहे. पुण्यात वडगाव शेरी मतदारसंघात बापूसाहेब पठारे तर हडपसर मध्ये शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना संधी देण्यात आली आहे. 2019 मध्ये जगताप यांच्या उमेदवारीला कात्री लावण्यात आली होती. परंतु पक्षाशी एकनिष्ठ राहत त्यांनी शहरात संघटनात्मक बांधणीवर जोर दिला. महापौर तसेच शहराध्यक्ष म्हणून शहरात केलेल्या कामाच्या जोरावर त्यांना हडपसरमधून मैदानात उतरवण्यात आलं आहे.
हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात जोरदार रस्सीखेच सुरू होती. ठाकरेसेनेकडून उमेदवारी मिळवण्यासाठी माजी आमदार महादेव बाबा आग्रही होते. परंतु अखेर प्रशांत जगताप यांच्या नावावर शरद पवार गटाकडून शिक्काम होतो करण्यात आल आहे. अजित पवार गटाचे विद्यमान आमदार चेतन तुपे यांच्याशी त्यांचा सामना होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिटणीस पदापासून प्रशांत जगताप यांनी कामाला सुरुवात केली, पुढे २०१२ मध्ये पुणे महापालिकेत पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून ते निवडून आले. 2016-17 मध्ये पुणे शहराचे महापौर पद जगताप यांनी भूषवले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर देखील प्रशांत जगताप यांनी शरद पवारांसोबत राहण्याची भूमिका घेतली. लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदार संघामध्ये खासदार अमोल कोल्हे यांच्या विजयासाठी जगताप यांनी हडपसरमध्ये मोर्चेबांधणी केली, लोकसभा प्रचारामध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रशांत जगताप हे हडपसरमधून उमेदवार असतील, असे घोषित केलं होत .
राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्ष उमेदवार यादी
1. जयंत पाटील – इस्लामपूर
2. अनिल देशमुख- काटोल
3. राजेश टोपे- घनसावंगी
4. बाळासाहेब पाटील- कराड उत्तर
5. जितेंद्र आव्हाड- कळबा मुंब्रा
6. शशिकांत शिंदे – कोरेगाव
7. जयप्रकाश दांडेगावकर- वसमत
8. गुलाबराव देवकर- जळगाव ग्रामीण
9. हर्षवर्धन पाटील- इंदापूर
10. प्राजक्त तनपुरे -राहुरी
11. अशोकराव पवार- शिरुर
12. मानसिंगराव नाईक- शिराळा
13. सुनील भुसारा- विक्रमगड
14. रोहित पवार- कर्जत जामखेड
15. विनायकराव पाटील- अहमदपूर
16. राजेंद्र शिंगणे- सिंदखेडराजा
17. सुधाकर भालेराव- उदगीर
18. चंद्रकांत दानवे- भोकरदन
19. चरण वाघमारे- तुमसर
20. प्रदीप नाईक- किनवट
21. विजय भांबळे-जिंतूर
22. पृथ्वीराज साठे- केज
23. संदीप नाईक- बेलापूर
24. बापूसाहेब पठारे- वडगाव शेरी
25. दिलीप खोडपे- जामनेर
26. रोहिणी खडसे- मुक्ताईनगर
27. सम्राट डोंगरदिवे-मुर्तिजापूर
28. रविकांत बोपछे- तिरोडा
29. भाग्यश्री अत्राम- अहेरी
30. बबलू चौधरी- बदनापूर
31. सुभाष पवार- मुरबाड
32. राखी जाधव- घाटकोपर पूर्व
33. देवदत्त निकम- आंबेगाव
34. युगेंद्र पवार – बारामती
35. संदीप वर्पे- कोपरगाव36. प्रताप ढाकणे- शेवगाव
37. राणी लंके- पारनेर
38. मेहबूब शेख- आष्टी
39. करमाळा-नारायण पाटील
40. महेश कोठे-सोलापूर शहर उत्तर
41. प्रशांत यादव- चिपळूण
42. समरजीत घाटगे – कागल
43. रोहित आर आर पाटील- तासगाव कवठेमहाकाळ
44. प्रशांत जगताप -हडपसर
महत्वाच्या बातम्या-
-Assembly Election: चिंचवडमध्ये जगतापांची प्रचाराला सुरवात; आघाडीतून कोण टक्कर देणार?
-पर्वतीत महाविकास आघाडीचा उमेदवार ठरेना! माधुरी मिसाळांनी सुरु केला प्रचार
-पर्वती मतदारसंघात मोठा ट्विस्ट; आबा बागुलांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, पक्ष कोणता?
-इंदापूरात तिहेरी लढत; हर्षवर्धन पाटलांचा उमेदवारी अर्ज भरला; भरणे, मानेंना देणार टक्कर