पुणे : अवध्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीतील सर्व पक्षांकडून जोरदार पक्षांसह इच्छुकांची रस्सीखेच सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. अशातच आता पुणे शहरात असलेल्या ८ विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या इच्छुकांची संख्या तब्बल ८५ वर गेली आहे.
पुण्यात एकट्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून ४१ जण इच्छुक आहेत. सर्वांधिक इच्छुकांची संख्या ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांती आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांचा स्ट्राईक रेट चांगला असल्याने ही इच्छुकांची संख्या वाढल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे शहरातील ८ मतदारसंघासाठी काँग्रेसमध्ये असणाऱ्या इच्छुकांचे अर्ज मागवण्यात आले होते. काँग्रेसकडून थोडे ना थिडके तब्बल २४ जणांनी निवडणूक लढण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे.
दरम्यान, शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये देखील ८ विधानसभा मतदारसंघात तब्बल २० जण इच्छुक आहेत. त्यामुळे आता इच्छुकांची संख्या आणि राजकीय परिस्थिती यावरुन महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठकींमधून कोणाकोणाला उमेदवारीचा प्रसाद मिळतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात विधानसभेच्या ८ मतदारसंघात महाविकास आघाडीच्या इच्छुकांची संख्या ८५
-पुणेकरांनो सावधान! झिकाचा प्रादुर्भाव वाढतोय; आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू तर रग्णसंख्या किती?
-पर्वतीमध्ये आबा बागुलांना वाढता पाठिंबा; गणेशोत्सवाच्या माध्यमातून प्रचाराची एक फेरी पूर्ण
-Ganesh Festival: काश्मीरमधील बाप्पाला भव्य विसर्जन मिरवणुकीने भावपूर्ण निरोप
-पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २७ तारखेला पुणे दौऱ्यावर; ‘या’ मेट्रो मार्गाचे करणार उद्घाटन