पुणे : शहरातील कोंढवा रस्त्यावर ग्रेड सेपरेटरच्या कामासाठी रस्त्याच्या लगत खड्डा खोदण्यात आले आहे. या खड्यात साचलेल्या पाण्यात कपडे धुण्यासाठी ४ मुली गेल्या होत्या. त्या ४ ही मुलींचा त्या पाण्यात बुडाल्या आहे. ही घटना शनिवारी पावणे १२ वाजताच्या सुमारास घडली आहे. चौघींपैकी तिघींना वाचवण्यात यश आले आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी पोहचले. या घटनेमधून पालिकेचा आणि ठेकेदाराचा हलगर्जीपणा समोर आला आहे. मुस्कान देवा शीलावत (वय १६) असे मृत्यूमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. तर, सरगम जगदीश सिलावत (वय १५), जणूबाई रमेश शिलावत (वय १६), तेजल जगदीश शीलावट (वय १२) यांना वाचवण्यात यश आले आहे.
कोंढवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिलावत हे हे बांजरा समाजाचे असून मागील ४ महिन्यापासून कोंढवा परिसरात राहण्यासाठी आले आहेत. चाकू-सुरी अशा घरातील वापराच्या वस्तूंना धार लावणे आणि चादर विक्री अशी कामे करुन त्यांचा उदरनिर्वाह चालतो. सकाळी ११ च्या सुमारास या मुली कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. मुस्कानची चप्पल पाण्यात पडली आणि पाण्याचा अंदाज नसल्याने ती पाण्यात बुडत होती. तिला वाचवण्यासाठी बाकीच्या तिघी देखील पाण्यात उतरल्या होत्या.
चौघींनाही पाण्यातून बाहेर काढल्यानंतर जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी मुस्कानला मृत असल्याचे घोषीत केले. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा ससून रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला.
महत्वाच्या बातम्या-
-सुनील शेळकेंनी सांगितलं बारणेंचं मताधिक्य कमी होण्याचं नेमकं कारण; म्हणाले…
-पोलीस -वारकऱ्यांमध्ये झालेल्या झटापटीमुळे वारकरी संघटनेचं मोठं पाऊल
-चंद्रकांत पाटलांकडून पावसाळापूर्व कामांचा आढावा; ‘ही’ कामे पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना
-अजित पवारांना मोठा धक्का; ‘या’ बड्या मंत्र्याचे शरद पवार गटात होणार कम बॅक?