पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यातील शिवाजीनरग सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट नव्य मेट्रोच्या मार्गिकेचे उद्घाटन काल गुरुवारी होणार होते. मात्र पावसामुळे मोदींचा दौरा हा पुढे ढकलण्यात आला आहे. आता येत्या २९ सप्टेंबरला ऑनलाईन पद्धतीने पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रो, विविध विकास कामांचा उद्घाटन तसेच भूमिपूजन होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मोहोळांनी ही माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थितीत राहणार. गणेश कला क्रीडा मंडळ येथे कार्यक्रम होणार आहे. गुरुवारी पंतप्रधान मोदी मेट्रोचा प्रवास करुन नव्या मार्गाचे उद्घाटन करणार होते. हा आयोजित कार्यक्रम गेल्या काही दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे रद्द करण्यात आला. कार्यक्रम झाला असता तर वाहतूक प्रश्न वाढला असता. नागरिकांना आणखी त्रास झाला असता. नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी म्हणून कार्यक्रम रद्द करुन ऑनलाईन पद्धतीने हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
‘पुण्यात नवीन मेट्रो मार्गाला परवानगी मिळेल. मेट्रो जाळ वाढवण्याचा प्रयत्न आहे. विरोधरांना कशाचं राजकारण करावे हे कळत नाहीये. त्यांच्या काळात एकही मेट्रो झाली नाही. शेकडो लोकांचा बळी गेल्याने अयशस्वी बी. आर. टी. त्याच्या काळात झाली. अपघाताला बळी पडलेले पूल झाले. पुणेकरांना सगळं समजत. स्वतः काही करता नाही. आणि आज कोणत्या नैतिक अधिकाराने उद्घाटन करायला गेले. पुणेकरांना सगळं समजतं’, असे मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-अग्रवालांच्या ‘बाळा’ला दिल्लीच्या कॉलेजात नाकारला प्रवेश; पोर्शे अपघात प्रकरणामुळे अडचणीत
-‘जोपर्यंत मेट्रो सुरू होत नाही, तोपर्यंत आम्ही…’; पुण्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांचं आंदोलन
-‘पुढच्या २४ तासात मेट्रो सुरु केली नाही तर…’; महाविकास आघाडीचा इशारा
-पुणेकरांनो सावधान! शहराला मुसळधार पावसाचा इशारा
-गावात स्मशानभूमी नाही, तर मतदान नाही; हवेली तालुक्यातील ‘या’ गावकऱ्यांची आक्रमक भूमिका