Technology : सध्याच्या बदलत्या युगात माणूस एकवेळ अन्न, वस्त्र निवाऱ्याशिवाय राहू शकतात पण मोबाईलशिवाय राहू शकत नाही. मुलभूत गरजांमध्ये प्रामुख्याने मोबाईल या उपकरणाचा समावेश झाला आणि मोबाईलने माणसाच्या आयुष्यात सर्वांत मोठं स्थान मिळवलं आहे. मोबाईलमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या. आपण मोबाईलमुळे जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यातील माणसाशी बोलू शकतो, एका क्लिकवर माहिती मिळवू शकतो. मात्र, मोबाईल वापराचे काही दुष्परिणाम माहिती आहेत का?
एका संशोधनानुसार मोबाईल वापरामुळे होणाऱ्या दुष्परिणाम तसेच आपल्या शरीरावर काय वाईट परिणाम होतात याबाबत धक्कादायक वास्तव समोर आले आहे. प्रत्येक जण सध्या सोशल मीडिया वापरत आहे. हा आजच्या जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. २०१९मध्ये करण्यात आलेल्या संशोधनानुसार, जे युवक दररोज किमान ३ तास सोशल मीडियावर सक्रिय असतात, त्यामुळे त्यांना नैराश्य, चिंता आणि रागाच्या समस्या अधिक प्रमाणामध्ये जाणवू लागल्या आहेत.
सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. लठ्ठपणा, लक्ष आणि स्पष्टता कमी होणे, आणि झोपेचा आभाव यांसारख्या समस्या जाणवू लागतात. मोबाईल फोन आणि सोशल मीडिया या व्यसनामुळे लोक तासंतास एकाच ठिकाणी बसून राहतात. शरीराच्या हालचाली कमी होतात. जेवतानाही मोबाईलचा अतिवापर सुरु असतो त्यामुळे अनेकदा किती जेवण केलं हे देखील समजत नाही परिणामी वजन वाढण्याची शक्यता वाढते. तसेच
मोबाईलच्या अतिवापरामुळे झोपेचा अभाव असल्याचे दिसून येते. अनेकदा मोबाईल वापरताना समजत नाही किती वेळ फोन वापरत आहे. झोपण्यापूर्वी मोबाईल हातात घ्यायची जवळपास प्रत्येकाची सवय झाली आहे. तासन् तास मोबाईल, रिल्स, फोटो, गेम्स वापरताना झोपेमध्ये व्यत्यय येतो. यामुळे निद्रानाश आणि इतर झोपेचे विकार जाणवू लागतात.
मोबाईल या एका उपकराने मानवी जीवनामध्ये अनन्य साधारण महत्व राहिले आहे. आता याच मोबाईलमुळे आपल्याला अनेक गोष्टी एका क्लिकवर समजत असतात. म्हणून माणसाने आपल्या मेंदूला लक्षात न ठेवण्याची सवय लावून घेतली आहे. सोशल मीडिया हे सर्व खऱ्या-खोट्या माहितीचे भांडार आहे. अशा स्थितीत मेंदूमध्ये अनेक प्रकारची माहिती साठून राहते, त्यातील बहुतांश माहिती निरुपयोगी असते. सोशल मीडिया पाहताना मेंदूचा एखादा कोपरा पकडते आणि त्याला निष्क्रिय बनवते, ज्यामुळे व्यक्तीचे लक्ष कमी होते. मेल्स, मेसेज, नोटिफिकेशन्स, कॉल्स, टेक्स्ट मेसेजेस या सगळ्यांमुळे एका गोष्टीचा शांतपणे विचार करण्याची क्षमता कमी होते आणि मन सतत अव्यवस्थित राहते.
महत्वाच्या बातम्या-
-शिरुरचा खासदार कोण? आढळराव पाटील मागील पराभवाचा वचपा काढणार का?
-शनिवारवाड्यात बाॅम्बची अफवा पसरविणाऱ्या बीडमधील तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
-पुणे पोलिसांना झालंय तरी काय? नाकाबंदीत पकडलेल्या तरुणाकडून करुन चक्क पाय चेपून घेतले
-शिरुरचा खासदार कोण? एक्झिट पोलनुसार आढळराव पाटील की अमोल कोल्हे मारणार बाजी
-मावळचा खासदार कोण होणार? सर्व एक्झिट पोलमध्ये आलं एकच नाव; वाचा कोणाच्या गळ्यात विजयाची माळ