पुणे : पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापामध्ये पुणे लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्याबद्दल केलेल्या टिकात्मक वक्तव्य केल्याने त्याची चर्चा राजकीय क्षेत्रात होत असून धंगेकरांनी केलेल्या या विधानाबद्दल नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे.
त्याचे असे झाले, पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धगेकर आणि वंचित आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांच्या वार्तालापाचे आयोजन केले होते. या तीनही उमेदवारांनी त्यांच्या दृष्टिकोनातून “पुण्याचं व्हिजन” काय आहे यांची मांडणी केली. त्यामध्ये मुरलीधर मोहोळ आणि वसंत मोरे यांनी त्यांचे पुण्याच्या विकासाबद्दलच्या व्हीजनबद्दल सविस्तर मांडणी केली. मात्र, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी त्यांचे ‘व्हीजन’ न सांगता केवळ सांगोपांग टीका करत वेळ मारून नेली. ही टीका करताना त्यांना ते काय बोलत आहेत याचे भान राहिले नाही. त्यांनी पुण्याच्या माजी खासदारांचा उल्लेख करत बापट साहेब, शिरोळे साहेब सभागृहात कितीवेळा बोलले? असा उल्लेख केला. याला मोहोळ यांनी आक्षेप घेत तुम्ही तुमचे व्हीजन सांगा असे सांगितले, तसेच दिवंगत माणसाबद्दल योग्य नाही असे सांगण्याचा प्रयत्न केला मात्र, धंगेकरांनी तुम्ही बोलला, मला बोलू द्या, तुम्ही ऐकत राहा असे उत्तर दिले.
या कार्यक्रमाचे काही वाहिन्यांवर थेट प्रक्षेपण सुरू होते. दिवंगत माणसांबद्दल शक्यतो नकारात्मक न बोलण्याचा अलिखित नियम शक्यतो सर्व राजकारणी पाळतात. परंतु, धंगेकरांना समजावूनही त्यांनी दिवंगत बापटांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ त्यांचे व्हीजन सांगताना गेल्या दहा वर्षात केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली झालेली देश पातळीवरची कामे. आणि मोदी सरकारच्या माध्यमातून पुणे लोकसभा मतदार संघात झालेली कामे याचा आढावा घेतला आणि खासदार झाल्यानंतर त्यांचे व्हीजन काय असणार आहे याबाबत सविस्तर विवेचन केले. वसंत मोरे यांनीही त्यांचे व्हीजन सांगितले. रवींद्र धंगेकर यांनी मात्र, पुण्याच्या व्हीजन बद्दल न बोलता मोहोळ यांनी सांगितलेल्या कामांवर टीका टिप्पणी करत केवळ वेळ मारून नेली. त्यांना त्यांच्या व्हीजन बद्दल पत्रकारांनी विचारल्यानंतरही त्यांनी केवळ मोहोळ यांनी सांगितलेल्या पुणे शहरातील योजनांमध्ये कशा त्रुटी आहेत याबद्दलचा पाढा वाचला.
महत्वाच्या बातम्या-
-चर्चा व्हिजनची, धंगेकर मात्र रमले वैयक्तिक टीकेत, पुण्याच्या व्हिजनवर नेली वेळ मारून