पुणे : राज्याच्या राजकारणात एकीकडे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा सुरु आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही नेते ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकत्र येणार का? याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. या सर्व प्रकरणावर अजित पवार गट आणि शरद पवार गटातील अनेक नेते पदाधिकाऱ्यांनी आपापली मते व्यक्त केली. त्यातच आता मावळचे अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी देखील या चर्चेवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते मावळमध्ये माध्यमांशी बोलत होते.
‘पोपट मेला पण सांगायचं कुणी, अशी ग्रामीण भागात म्हण आहे. अशी परिस्थिती राष्ट्रवादी शरद पवारांच्या नेत्यांची झाली आहे. अजित पवारांना पुढे करण्याचा प्रयत्न काही शरद पवारांचे नेते करत आहेत. आगामी काळात राष्ट्रवादी एकसंघ होत असेल आणि हातात हात घालून काम करत असेल तर आम्हाला देखील आनंद आहे. परंतु, अडचणींच्या काळात अजित पवारांसोबत राहिले त्यांना देखील विश्वासात घेतले पाहिजे. आमच्यासोबत जे कोणी येतील त्यांचं स्वागत करू’, असे वक्तव्य आता सुनील शेळके यांनी केले आहे.
“आगामी काळात राष्ट्रवादी एकत्र आली तर आश्चर्य वाटू देऊ नका. सहा महिन्यांपूर्वी जे नेते अजित पवारांवर टीका करत होते. भर सभेत म्हणत होते की, ‘काका मला वाचवा’, आता तेच नेते ‘दादा मला वाचवा’ असं म्हणत आहेत”, असा टोला सुनील शेळकेंनी शरद पवार गटातील काही नेत्यांना लगावला आहे. येत्या काळात हे दोन्हे नेते एकत्र येणार की नाही हा प्रश्न कायम असताना दोन्ही पक्षाचे नेते मात्र एकमेकांवर टीका-टिपण्णी करुन तोंडसुख घेताना दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘दोन्ही नेते एकत्र आले तर ‘त्यांची’ कुचंबणा होईल’; रुपाली पाटलांचा निशाणा कोणावर?
-‘कोणाला मंत्रिपद द्यायचं, कोणाला जेलमध्ये टाकायचं हे…’; रावसाहेब दानवेंचा रोख नेमका कोणाकडे?
-फडणवीस आज पुण्यातील मंत्री करणार फिक्स! कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ?
-‘पवार साहेबांनी निर्णय घेतला तर सगळेच एकत्र येतील’; शरद पवारांच्या प्रवक्त्याचा दावा
-पुण्यातील ‘ही’ बँक बनली मंदिर! साडे ३ किलो दत्त मुर्तीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी