पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचे अध्यक्ष शरद पवारांनी बारामती लोकसभा निवडणुकीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना बाहेरुन आलेले पवार असे अप्रत्यक्षपणे संबोधले होते. यावरुन राज्याच्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शरद पवार ज्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या त्या पत्रकार परिषदेत एका प्रश्नावर शरद पवारांच्या या वक्तव्यावर हसणाऱ्या खासदार डॉ. अमोल कोल्हेंवर आमदार अमोल मिटकरींनी जोरदार टीका केली आहे.
“हा वाद घरगुती जरी वाटत असला तरी शरद पवार यांनी जे वक्तव्य केलंय त्याचा सर्वच पक्षातून निषेध होत आहे. याबाबत आता स्वतः सुनेत्रा पवारांनी सांगितले आहे कि, पवार कुटुंबियांनी त्यांना सून म्हणून निवडलं. मात्र, बारामतीकरांनी त्यांना एक उमेदवार म्हणून निवडले आहे. त्यामुळे जनता त्यांच्या पाठीमागे सक्षमपणे उभी राहील”, असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.
“शरद पवारांची पत्रकार परिषद सुरू असताना खासदार पदावार असलेले डॉ. अमोल कोल्हे ज्या उन्मादात हसत होते हे बघता आम्हाला अमोल कोल्हेंनां असा प्रश्न विचारायचा आहे की त्या जागी तुमची आई, किंवा पत्नी असत्या तर ते अशाच प्रकारे हसले असते का? लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा हक्क आहे. कधीकाळी अजित पवारांच्या मदतीने अमोल कोल्हे त्या मतदारसंघातनं खासदार म्हणून निवडून आले आहेत. तेथील स्थानिकांना वाटलं असेल की खासदार बदलावा तर त्यात गैर काय, मात्र खासदार अमोल कोल्हे ज्या उन्मदातं हसले ते हास्य इतिहास कधीही विसरणार नाही” असं म्हणत अमोल मिटकरी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-“भाजपचे संकल्पपत्र म्हणजे विकसित भारताचे स्वप्न गाठण्याचा रोडमॅप”- मुरलीधर मोहोळ
-देशात पुणे, मुंबईमध्ये सर्वाधिक घरांची विक्री; गेल्या तीन महिन्यात १ लाखांपेक्षा जास्त घरे विक्री
-‘पुण्यकर्माच्या बदल्यात स्वर्गप्राप्ती करुन देतो’ म्हणत भोंदूनी डॉक्टरांना घातला ५ कोटींचा गंडा