पुणे : पुणे शहरातील गेल्या अनेक दिवसांपासून मद्य, अमली पदार्थांचे सेवन होत असून पुणे शहराची बदनामी होत आहे. शहराला आता पुण्यनगरी नाही तर ड्रग्जनगरी म्हणून संबोधू लागले आहेत. स्थानिकांसह सर्वच स्तरातून या प्रकरणावरुन सरकारवर संताप व्यक्त केला जात आहे. सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच आता पुणे ड्रग्ज प्रकरणात अधिवेशन रोखून धरणार, असा विश्वास ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी दाखवला आहे.
१४ व्या लोकसभेचे पावसाळी अधिवेशन उद्या २७ जूनपासून सुरु होणार आहे. या अधिवेशनामध्ये राज्य सरकारला अनेक मुद्द्यांवरुन धारेवर धरण्याची रणनिती आखली आहे. उद्यापासून शिंदे-फडणवीस यांच्या सरकारचे शेवटचे अधिवेशन सुरु होणार आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं बाजी मारली. तर, महायुतीची गणितं फसल्याचं पाहायला मिळालं. अशातच लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर उद्यापासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. १४ व्या विधानसभेचं हे शेवटचं अधिवेशन असणार आहे. या शेवटच्या अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी रणनीति आखली आहे.
‘ड्रग्ज प्रकरणात अधिवेशन रोखून धरणार’, असा विश्वास ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी दाखवला आहे. पुणे ड्रग्ज प्रकरणात ड्रग्ज माफिया आणि भाजप सरकार उघडं पडले आहे. पुण्यात यापूर्वीसुद्धा ड्रग्ज प्रकरणे झाली आहेत. काही दिवसांपूर्वी हिट अँड रन प्रकरणसुद्धा ड्रग्ज या विषयातून झाले आहे. त्यामुळे नाटक करण्याचे काम हे सरकार करत आहे. राज्याचे गृहमंत्री सपशेल अपयशी ठरले आहेत’, अशी टीका वैभव नाईक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यातील फक्त २३ पब अन् बारला परवानगी; त्यातील १ रद्दही झालाय, वाचा नेमका काय प्रकार
-धक्कादायक! पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव; डॉक्टरला अन् मुलीला झिकाची लागण
-पुण्यात डेंग्यू रुग्णसंख्या वाढली; पालिका प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपायोजना
-‘मी बारामतीची जबाबदारी दुसऱ्यांवर दिली होती, पण…’; शरद पवारांचा अजितदादांना अप्रत्यक्ष टोला
-वारकऱ्यांना सर्व सोईसुविधा द्या, हेमंत रासनेंची पालिककडे आग्रही मागणी; शिष्टमंडळासह घेतली भेट