पुणे : संपूर्ण राज्यात गेल्या काही आठवड्यांपासून उन्हाळा प्रचंड वाढत आहे. राज्यावर असलेले अंशत: ढगाळ वातावरण आता निवळले आहे. राज्यभर कोरडे वातावरण असून गुजरात, राजस्थानमधून उष्ण वारे राज्यात येत असल्यामुळे कमाल तापमानात वाढ होत आहे. सोमवारी मालेगावात पारा ४४ अंशांवर पोहोचला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये आरोग्य विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
किनारपट्टीलाही उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागला. सांताक्रुजमध्ये पारा ३९.१ अंश सेल्सिअसवर गेल्यामुळे मुंबईकरांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागला. उत्तर महाराष्ट्रात उन्हाच्या झळा बसत आहेत. सोमवारी मालेगावमध्ये राज्यात सर्वाधिक ४४.० अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. सोमवारी जळगावात ४३.४, पुण्यात ४१.८, औरंगाबाद ४१.४, नांदेड ४२.८, अकोला ४२.३, नागपूर ४०.१, अलिबाग आणि मुंबईत ३५.२, तर डहाणूत ३६.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.
मुंबईत ३५.२, सांताक्रुजमध्ये ३९.१, अलिबागमध्ये ३५.२ आणि डहाणूत ३६.४ अंश सेल्सिअस तापमान होते. आज, मंगळवारीही ठाणे, रायगड, मुंबईला उष्णतेसाठी ‘यलो अलर्ट’ दिला आहे. मध्य महाराष्ट्रात सध्या दक्षिणोत्तर वारा खंडितता प्रणाली तयार झाली आहे. त्यामुळे वाऱ्याचा वेग मंदावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-AIMIM चा पुण्यात जोरदार प्रचार; अनिस सुंडकेंच्या पदयात्रेला नागरिकांचा प्रतिसाद
-‘मुस्लिम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात’; पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ टीकेवर ओवैसींचं प्रत्युत्तर
-पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना ‘भटका आत्मा’ म्हणून केला उल्लेख
-“दुसऱ्यांवर टीका करून सहानुभूती मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न”; आढळरावांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
-पंतप्रधान मोदींचा सत्कार करताना मोहोळ अचानक थांबले अन् सुनेत्रा पवारांना पुढे बोलवलं, पहा काय झालं