पुणे : बारामती लोकसभा निवडणुकीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या बुधवारी दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या. सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर प्रथमच त्यांनी दौंड तालुक्यात संयुक्त दौरा केला. या निमित्ताने महायुतीचे सर्वच प्रमुख नेते एकवटल्याचे पहायला मिळाले. दौंड तालुक्यातील खडकी येथून सुनेत्रा पवार यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, कांचन कुल, वैशाली नागवडे, उत्तमराव आटोळे, नंदू पवार, वीरधवल जगदाळे आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
‘आम्ही प्रमुखच आता एकत्रपणाने या निवडणुकीला सामोरे जात आहोत. त्यामुळे दौंड तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळेल’, असा विश्वास माजी आमदार रमेश थोरात यांनी व्यक्त केला. ‘महायुतीत आम्ही सर्वांनी एकत्रित पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता स्थानिक पातळीवरही कार्यकत्यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन सुनेत्रा पवार यांना अधिकाधिक मतदान होईल यासाठी प्रयत्नशील राहावे”, असे आवाहन राहुल कुल यांनी मतदारांना केले आहे.
‘देशाचे भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे. विकासाला महत्त्व देणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे. महायुतीची वज्रमूठ दिवसेंदिवस घट्ट होत असताना आपणही त्यात मतदान करून सामील व्हावे आणि विकासरथात हातभार लावावा’, असे आवाहन सुनेत्रा पवार यांनी यावेळी मतदारांना केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मावळमध्ये संजोग वाघेरेंना शह देण्यासाठी नाशिकच्या संजय वाघेरेंची एन्ट्री!
-बिग बॉस फेम मीरा जगन्नाथचे हॉट फोटोशूट; नेटकऱ्यांनी केले जोरदार कौतुक!
-हजारोंची गर्दी अन् दिग्गजांची उपस्थिती! आढळराव पाटलांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
-उन्हाळ्यात सोडा पिण्याचे प्रमाण वाढले असेल तर सावधान; पडू शकता ‘या’ गंभीर आजारांना बळी
-आढळरावांना लीड किती मिळणार? अजित पवार म्हणतात, ‘मी ज्योतिष नाही, आमचा उमेदवार निवडून येईल!’