नवी दिल्ली | पुणे : भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि राजस्थानच्या सहप्रभारी विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या विजया रहाटकर या पहिल्या मराठी व्यक्ती ठरल्या आहेत. विजया रहाटकर यांनी महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाचं अध्यक्षपदी देखील त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. विजया रहाटकर यांना केंद्रीय राज्यमंत्री पद असणार आहे.
महिलांच्या उन्नतीसाठी घटनात्मक आणि कायदेशीर मुद्दांचा फेरआढावा घेणे, संसदीय- वैधानिक शिफारशी करणे, महिलां विषयक धोरणात्मक बाबींसाठी केंद्र व राज्य सरकारांना सल्ला देणे, महिलां विषयक प्रश्नांचे संशोधन करणे, त्यांच्या अडीअडचणींची दखल घेऊन कारवाई करणे, अशा संवैधानिक दर्जा असणाऱ्या राष्ट्रीय महिला आयोगाकडे व्यापक असे अधिकार आहेत. १९९२ मध्ये विशेष कायद्यान्वये स्थापन झालेल्या या आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत.
विजया रहाटकर यांची २०१६ ते २०२१ दरम्यान महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी त्या भाजप महिला मोर्चाच्या देखील अध्यक्षा होत्या. महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून विजया रहाटकरांनी ‘सक्षमा’, ‘प्रज्ज्वला’, ‘सुहिता’ यांसारखे महिला केंद्रित अनेक उपक्रम राबविले. ‘सक्षमा’ उपक्रमाच्या माध्यमातून ऍसिड हल्ला झालेल्या पीडितांना देण्याचे काम केले. प्रज्ज्वला योजनेतून केंद्र सरकारच्या योजनांशी लाखो महिलांना जोडून घेतले. सुहिता योजनेतून महिलांना 24×7 हेल्पलाइन उपलब्ध करून दिली आहे.
‘निर्मल वारी’ योजनेतून लाखो महिला वारकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या. महिला केंद्रित विकास आणि महिला नेतृत्वाखाली विकास या संकल्पनांना कायदेशीर सुधारणांचा आधार मिळावा यासाठी वेगवेगळ्या सुधारणा सुचविल्या आहेत. यामध्ये पोस्को सेल, ट्रिपल तलाक सेल, मानवी तस्करी विरोधात विशेष सेलची निर्मिती यांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Assembly Election: खडकवासल्याच्या राजकारणात नवी खेळी; अजितदादांच्या शिलेदाराने थोपटले दंड
-काँग्रेसला जिंकायचाय पारंपारिक मतदारसंघ, पण अंतर्गत वादाचा होणार भाजपला फायदा?
-भावी अधिकाऱ्यांच्या स्वप्नांची राख; अभ्यासिकेला आग, विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले
-अजितदादांच्या शिलेदाराचा ठाकरे सेनेत प्रवेश; चिंचवड विधानसभेचं गणित बदलणार?
-कसब्यात काँग्रेसमध्ये बंडाचा झेंडा, महिला नेत्याचा लढण्याचा नारा; धंगेकरांना डोकेदुखी