बारामती : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच पवार कुटुंबातील २ सदस्य आमनेसामने आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रस पक्षाचे दोन गटामध्ये विभाजन झाले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार शरद पवार यांच्याकडून बारामतीमध्ये उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आले. हे दोन्ही उमेदवार हे एकाच कुटुंबातील असल्याने ही निवडणूक दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे.
या निवडणुकीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून आहे. शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली. बहुतांश सामान्य बारामतीकर हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत भावनिक जोडले गेले आहेत. तर अनेक बारामतीकर हे अजित पवारांनी बारामतीचा कायापालट केला म्हणून अजित पवारांसोबत आहेत.
बारामतीमधील विकास कामांचा मुद्दा दोन्ही गटाने या निवडणूक प्रचारासाठी उचलून धरला होता. मतदानाचा निकाल आता अवघ्या काही तासांवर असून या लढतीत कोण बाजी मारणार हे स्पष्ट होणार आहे. बारामती मतदारसंघामध्ये एकूण ५९.५० टक्के मतदान झाले आहे. २०१९मधील निवडणुकीच्या तुलनेत यंदा बारामती मतदानाची टक्केवारी घसरली आहे. २०१९मध्ये ६१.७० टक्के मतदान झाले होते.
सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातील लढत ही अटीतटीची आहे. बारामती लोकसभेत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघामधील मतदानाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास खडकवासला आणि पुरंदरमध्ये मतदानाची सर्वाधिक कमी टक्केवारी नोंदवली गेली आहे. या टक्केवारीचा महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे.
एकूण मतदान – ५९.५० टक्के
दौंड – ६०.२९ टक्के
इंदापूर – ६७.१२ टक्के
बारामती – ६९.४८ टक्के
पुरंदर- ५३.९६ टक्के
भोर – ६०.११ टक्के
खडकवासला – ५१.५५ टक्के
खडकवासला मतदारसंघामध्ये भाजपचे वर्चस्व आहे. या भागातून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना मोठा लीड मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु खडकवासला मतदारसंघात अवघे ५१.५५ टक्के मतदान झाले. यामुळे महायुतीसाठी काळजीचा मुद्दा आहे. याशिवाय अजित पवारांनी दमदाटीची भाषा वापरली असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तसेच अजित पवारांचे सर्वात कट्टर विरोधक होते त्या शिवसेनेच्या विजय शिवतारे यांच्या पुरंदरमध्ये अवघे ५३.९६ टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक मतदान हे भोरमधून झाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अरुण गवळीच्या सुटकेनंतर राजकीय पक्षांची साद; शिंदे-फडणवीस लागले तयारीला
-मोबाईल माणसाचं आयुष्य; याच मोबाईलचा आपल्या मेंदूवर कसा परिणाम होतोय?
-शिरुरचा खासदार कोण? आढळराव पाटील मागील पराभवाचा वचपा काढणार का?
-शनिवारवाड्यात बाॅम्बची अफवा पसरविणाऱ्या बीडमधील तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
-पुणे पोलिसांना झालंय तरी काय? नाकाबंदीत पकडलेल्या तरुणाकडून करुन चक्क पाय चेपून घेतले